Viral Video
Viral Video Sakal
Trending News

Viral Video : मस्ती नडली! पाय हँडलवर, हात आकाशात अन् सायकल गेली खड्ड्यात; पोलिसांनी शेअर केला व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

सायकल चालवताना स्टंट करणारे अनेकजण आपण पाहिले असतील. पण काही स्टंट जीवावर बेतत असतात. त्यामुळे अशा जीवघेण्या गोष्टी करायच्या नसतात हे सांगूनही काही लोकं एकत नसतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सायकलच्या हँडलवर पाय ठेवून सायकल चालवत आहे. सायकल चालवत असताना दोन्ही हातसुद्धा या व्यक्तीने वर केले आहेत. हा स्टंट करत असताना या व्यक्तीचे सायकलवरील नियंत्रण सुटले आणि त्याची सायकल एका खड्ड्यात जाऊन पडली. सायकलसोबत व्यक्तीसुद्धा रस्त्यावर जोरात आपटला.

या अपघातामध्ये सदर व्यक्तीला चांगलीच दुखापत झाली आहे. जीवावर बेततील असे स्टंट का करायचे असा प्रश्न आपल्यालाही पडला असेल. आपणही अंगलट येतील अशा गोष्टी करताना काळजी घेतली पाहिजे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी यावर मजेशीर कमेंट आल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी हा व्हिडिओ शेअर केला असून रस्त्यावरून गाडी चालवताना सुरक्षित चालवा असं अवाहन केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

SCROLL FOR NEXT