VIral Video  Sakal
Trending News

Viral Video : धक्कादायक! सरकारी डॉक्टरांऐवजी होमगार्डनेच काढला महिलेचा एक्स-रे

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : उत्तरप्रदेशमध्ये एका सरकारी दवाखान्यातील अजब प्रकार समोर आला आहे. सरकारी डॉक्टरांऐवजी एका होमगार्ड कर्मचाऱ्याने महिलेचा एक्सरे काढला आहे. उत्तरप्रदेशातील बलिया येथे ही घटना घडली असून या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गार्ड एका महिलेला एक्सरे रूम मध्ये घेऊन येतो, तिला हात वर करायला सांगतो आणि त्यानंतर एक्सरे मशीन खाली ओढताना दिसत आहे. तर या ठिकाणी अजून एक होमगार्ड व्हिडिओत दिसत आहे. याप्रकरणी बलियाचे जिल्हा दंडाधिकारी रवींद्र कुमार म्हणाले की, अधिकाऱ्यांनी व्हिडिओची दखल घेतली आहे आणि मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही याबाबत सतर्क करण्यात आले आहे. गार्डने नेमकं काय काय केलं, याचा सविस्तर अहवालही मागवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, "हे महिलेच्या आरोग्याशी खेळत आहे. जर मशीन चुकीच्या पद्धतीने चालवली गेली असती तर काहीतरी चूक झाली असती. अशा वेळी जबाबदारी घेतली पाहिजे," असं कुमार पुढे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT