Guinness World Records Names Youngest Male Artist esakal
Trending News

World's Youngest Artist : सोशल मीडियावर फेमस झालेला चिमुकला चित्रकार पाहिलात काय? वयाच्या पहिल्या वर्षीच 'गिनीज बुक'मध्ये नोंद

Guinness Book Viral Artist: वयाच्या सहाव्या महिन्यातच सुरु केली होती चित्रकारी,सर्व स्तरातून कौतुक अन्..फर्स्ट लेडीची भेट

सकाळ डिजिटल टीम

Viral Young Artist: गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेल्या जगातील सर्वांत तरुण कलाकाराची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे. या चिमुकल्या कलाकाराचे नाव आहे आसा-लियाम नाना सॅम अँक्रा. घाना (West Africa) येथील हा कलाकार अवघ्या एक वर्ष, १५२ दिवसांचा आहे. त्याच्या आई, चंटेल ही स्वतः एक कलाकार आहे.

आसा-लियामला अवघ्या सहा महिन्यांचा असतानाच चित्रकलेची आवड निर्माण झाली, असं त्याच्या आईने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सला सांगितले. चंटेल एकदा कमिशनवर चित्र रंगवत असताना, जमिनीवर थोडे रंग आणि अंथरलेले कापड ठेवून त्याला खेळण्यासाठी दिले होते. त्याचवेळी त्याने त्यावर रंगांची अजब गुंफण केली आणि त्याच्या हातातील कलेची जादू दिसली.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्याची काही चित्रेही सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या चिमुकल्या चित्रकारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. "वाह! अतिशय सुंदर. खूप हुशार चिमुकला आहे," असे एका वापरकर्त्याने म्हटले आहे. तर दुसऱ्याने असे म्हटले आहे की, "हे फक्त रंगांची उधळण आहे, मात्र, "ही चित्रे खूप सुंदर आहेत," अशी प्रतिक्रियाही काही जणांनी दिली.

नुकतेच त्याला मिळालेल्या या यशामुळे आसा-लियाम फक्त राष्ट्रीय माध्यमांचेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय माध्यमांचेही लक्ष्य बनला आहे. त्याच्या प्रतिभेमुळे त्याची भेट घानाच्या प्रथम महिला रेबेका अकुफो-अडो यांच्याशी झाली. या भेटीमुळे त्याची कला आणि प्रतिभा यांचे किती मोठे कौतुक होत आहे हे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT