Viral Video
Viral Video Sakal
Trending News

Viral Video: IAS ऑफिसर हॉस्पिटलमध्येच ढसाढसा रडल्या; रडतंच दिले आदेश

सकाळ डिजिटल टीम

एका IAS ऑफिसर महिलेचा रडतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. अपघातातील जखमी रूग्णांना भेटायला गेलेल्या या महिला ऑफिसरचा व्हिडिओ पाहून अनेकांनी या व्हिडिओला शेअर केले आहे. रूग्णांची हॉस्पिटलमधील अवस्था पाहून रडत रडतच आदेश दिल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.

(IAS Officer Crying Viral Video)

दरम्यान, व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ उत्तरप्रदेशमधील लखनऊच्या विभागीय आयुक्त रोशन जेकब यांचा असल्याचं समोर आलं आहे. अधिक माहितीनुसार, एका अपघातातील जखमी रूग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या गैरसोयीमुळे विभागीय आयुक्त त्यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती आहे. तर त्या भेटीत एका लहान मुलाची अवस्था पाहून त्यांना रडू कोसळले आहे.

त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. रडत रडतच त्यांनी आदेश दिले असून त्या मुलाचे ज्या ठिकाणी उपचार होतील त्या ठिकाणी नेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यांच्या या कर्तृत्वामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. तर हा व्हिडिओ सध्या प्रचंड शेअर केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT