सध्या अंबानी कुटुंब अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नामुळं चर्चेत आहे. अशातच ईशा अंबानी एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आली आहे. एका मुलाखतीदरम्यान, ईशा अंबानीने तिच्या जुळ्या मुलांबद्दल मोठा खुलासा केला आहे. (Isha Ambani Opens Up About Conceiving Kids Through IVF)
'वोग' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ईश अंबानीने मनमोकळ्या गप्पा मारल्या. आपल्या खासगी आयुष्यावर बोलताना ईशाने आपल्या जुळ्या मुलांवर भाष्य केलं. तिनं दोन्ही मुलांना जन्म आयव्हीएफद्वारा दिल्याचा खुलासा केला आहे.
नेमकं काय म्हणाली ईशा?
माझ्या जुळ्या मुलांचा जन्म आयव्हीएफद्वारा झाला हे सांगण्याच मला काहीच चुकीच वाटत नाही. ही खूप साधी गोष्ट आहे. ही गोष्ट लपून राहण्यासारखी किंवा लाज वाटण्यासारखी नाही. ही खूप कठीण प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही त्याचा अवलंब कराल. यामुळे तुम्हाला शारीरिक थकव्याचाही सामना करावा लागतो.
तसेच ईशाने यावेळी आयव्हीएफवरही भाष्य केलं. ती म्हणाली, आधुनिक तंत्रज्ञान जर मुलांसाठी जगात आले आहे. मग ते स्वीकारण्यात काय चुकीचं आहे. तिच्या बोलण्यावरुन हे स्पष्ट झालं की, काही लोकांनी आयव्हीएफबाबत गैरसमज निर्माण केले आहेत. लोक त्यांच्यापासून जन्मलेल्या मुलांकडे वेगळ्या नजरेने पाहतात.
नीता अंबानी यांनीही आयव्हीएफद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला होता
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना तीन मुले आहेत. जेव्हा नीता अंबानी पहिल्यांदा आई बनल्या तेव्हा त्यांनी 23 ऑक्टोबर 1991 रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यांच्या पोटी ईशा आणि आकाशचा जन्म झाला.
ईशा अंबानीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, तिने 12 डिसेंबर 2018 रोजी उद्योगपती आनंद पिरामल यांच्याशी लग्न केले. हे दोघेही मुंबईतील वरळी येथे बांधलेल्या 'गुलिता' या आलिशान व्हिलामध्ये राहतात. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन जुळी मुले आहेत. ईशा अंबानी 19 नोव्हेंबर 2022 रोजी आई झाली. तिच्या मुलाचे नाव कृष्णा आणि मुलीचे नाव आदिया आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.