Viral Video
Viral Video Sakal
Trending News

Viral Video : "आळशी असाल तर ही अंंघोळ तुमच्यासाठी; सगळं कसं आपोआप घडतंय"

सकाळ डिजिटल टीम

आपल्यालाही दैनंदिन कामाचा कंटाळा येतो का? काही जणांना तर झोपेतून उठायचाच कंटाळा येत असतो. आपण खूप वेळ झोपावं असं सर्वांना वाटतं पण दररोजच्या कामामुळे ते शक्य होत नाही. रविवारी प्रत्येकजण जास्त वेळ झोपण्याचा प्रयत्न करतो. काही लोकांना अंघोळ करायचा पण कंटाळा येतो, त्यामुळे ते सुट्टीच्या दिवशी दुपारून अंघोळ करत असतात. पण सध्या एका अॅटोमॅटिक अंघोळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आपण काहीच न करता जर आपली अंघोळ होते असं आपल्याला कुणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही पण हा व्हिडिओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. सदर तरूण झोपेतून उठून फक्त पुढे पुढे जात राहतो आणि त्याची अंघोळ आपोआप होत जाते असं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सदर तरूणाने पहिल्या टप्प्यावर शॉवर बसवलं आहे, दुसऱ्या टप्प्यात त्याच्या शरिराला साबणाचा फेस लागतो. त्यानंतर पुन्हा शरिरावर पाणी पडते आणि शरीर धुवून निघते. पुढे गेल्यानंतर ड्रायरच्या माध्यमातून त्याचे शरीर कोरडे होते. पुढे हात वर केल्यावर त्याच्या अंगात शर्ट पडतो आणि खाली उडी मारल्यानंतर पँडसुद्धा आपोआप घातली जाते. दरवाजा उघडल्यानंतर त्याच्या डोक्यात टोपीसुद्धा आपोआप येते आणि तो तयार होऊन निघून जातो.

दरम्यान, हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "आळशी असाल तर ही अंंघोळ तुमच्यासाठी; सगळं कसं आपोआप घडतंय" अशा विनोदी कमेंट नेटकऱ्यांनी केल्या असून हा व्हिडिओला अनेकांनी पसंती दर्शवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT