Met Gala 2023  esakal
Trending News

Met Gala 2023 : सेलिब्रिटी असतील जगभरातले, पण रेड कार्पेट मात्र भारतातलंच; हे कनेक्शन माहित आहे का?

या इव्हेंटला प्रियंका चोप्रा, निक जोनस, आलिया भट्ट या कलाकारांसह जगभराताली अनेक स्टार्स रेड कार्पेटवर त्यांचा जलवा दाखवताना दिसले.

सकाळ डिजिटल टीम

Met Gala 2023 : जगातील सगळ्यात मोठा फॅशन इव्हेंट ज्याची सगळे आतुरतेने वाट बघत होते तो सोमवारी न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये पार पडला. या इव्हेंटला प्रियंका चोप्रा, निक जोनस, आलिया भट्ट या कलाकारांसह जगभराताली अनेक स्टार्स रेड कार्पेटवर त्यांचा जलवा दाखवताना दिसले.

रेड कार्पेटवर चमकणाऱ्या जगभरातील स्टार्सचं कौतुक तुम्ही ऐकलंतच. मात्र त्यांची आणि मेट गालाची शान वाढवणारा रेड कार्पेट कोणी तयार केलाय तुम्हाला माहितीये काय?

जगातील सगळ्यात मोठ्या फॅशन इव्हेंटसाठी वापरण्यात आलेला रेड ब्लू कार्पेट हा दक्षिण भारतातील केरळ राज्यातील कारागिरांनी स्वत:च्या हातांनी तयार केलाय.

केरळमध्ये शिवन संतोष आणि निमिषा श्रीनीवास यांचा केरळ बेस्ड डिझाइन स्टुडिओ आहे. मेट गालातील आकर्षक कार्पेट बनवण्याची जबाबदारी या दोघांना देण्यात आली होती.

हा भव्य कारपेट केरळमध्ये सिसल फायबरने तयार करण्यात आलाय. नंतर त्याला युनायटेड स्टेट्सच्या डिझायनर्सने रंगवले. जगाच्या सगळ्या मोठ्या इव्हेंटमध्ये जगभरातले सेलिब्रिटी आले होते. मात्र भारतात तयार झालेल्या या रेड कार्पेटने मेट गाला इव्हेंटची शोभा वाढवलीय. ही गर्वाची आणि आनंदाची बाब साजरी करण्यासाठी डिझायनर्सने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कार्पेटवरील सेलिब्रिटींचे काही फोटो शेअर केले आहेत. (Met Gala 2023)

डिझाईन हाऊस, 'Neytt by Extraweave', यांनी त्यांच्या अधिकृत Instagram पेजद्वारे सलग दुसऱ्यांदा मेट गालासाठी कार्पेट बनवल्याबाबत अभिमान व्यक्त केला आहे.

मेट गालामधील आकर्षक कार्पेटच्या फोटोसह, त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर आणि कार्पेट तयार करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकणाऱ्या अनेक स्टोरीज शेअर केल्या. युनायटेड स्टेट्समध्ये डिझायनर्सनी रंगवलेल्या कार्पेटला विणण्यासाठी कामगारांना एकूण साठ दिवस लागलेत.

डिझाईन हाऊस केरळमधील अलप्पुझा येथे असून त्याचे नेतृत्व शिवन संतोष आणि निमिषा श्रीनिवास करत आहेत.

या कार्यक्रमात किम कार्दशियन, रिहाना, डोजा कॅट, लेडी गागा, बियॉन्से आणि टेलर स्विफ्ट यांसारख्या काही आघाडीच्या सेलिब्रिटी देखील दिसल्या. (Entertainment)

मेट गाला 2023 ची थीम चॅनेलचे क्रिएटिव्ह डायरेक्टर असलेले दिवंगत डिझायनर कार्ल लेजरफेल्ड यांना समर्पित होती. केरळच्या कारागिरांचे कर्तुत्व आणि त्यांची मेहनत मेट गालातील आकर्षक कार्पेटच्या माध्यमातून जगापुढे आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cow E-attendance: गायींनाही आता ई-अटेंडन्स द्यावा लागणार! एक विशेष मायक्रोचिप विकसित; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi Horoscope Prediction : आजपासून फक्त 24 दिवसांमध्ये बदलणार 'या' राशींचं नशीब ! बक्कळ श्रीमंतीचा योग

वाहतुकीचा ‘नवा अध्याय’ लिहिला जाणार! गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे कोंडीतून दिलासा मिळणार! नवी मुंबई काही मिनिटांत गाठता येणार!

November 2025 Horoscope : नव्या आठवड्यात 'या' 3 राशींच्या लोकांचा होणार फायदाच फायदा..घरी येणार पैसा-गुडलक, तुमची रास आहे का?

Latest Marathi News Update : वर्ल्ड कप फायनलमध्ये शफाली वर्माचे अर्धशतक, स्मृती मानधनासोबत केली शतकी भागीदारी

SCROLL FOR NEXT