Viral Video 
Trending News

Viral Video: पिल्लाला वाचवण्यासाठी आईची मृत्यूशी झुंज, थराराक व्हिडीओ पहा...

सकाळ डिजिटल टीम

Viral Video : आई आपल्या पिल्लांसाठी काहीही करते, असे म्हणतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी आईने मृत्यूशी झुंज दिली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक आई आपल्या पिल्लाचे संरक्षण कसे करते हे पाहता येईल.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक जिराफ आपल्या पिल्लासोबत उभे असल्याचे दिसत आहे. जिराफासमोर एक तरस (Hyenas) देखील उभे आहे. जिराफच्या मुलावर हल्ला करून त्याला आपला बळी बनवण्याच्या हव्यासात तो असतो. मात्र मादी जिराफ आपल्या बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करते.

तरस वारंवार जिराफाच्या बाळावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते परंतु मादी जिराफ आपल्या बाळासाठी ढाल बनून उभी राहते आणि तरसाला दूर पळवून लावते. हा व्हिडिओ ट्विटरवर @Gabriele_Corno नावाच्या युजरने शेअर केला आहे आणि व्हिडिओ शेअर केल्यानंतर तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ 5 लाख लोकांनी पाहिला आहे आणि 9 हजार लोकांनी त्याला लाईक केले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

एका यूजरने कमेंटमध्ये म्हटलं की, मी अनेकदा पाहिलं आहे की जिराफांना जेव्हाही त्यांची पिल्ले संकटात असल्याचे वाटते. तेव्हा ते खूप आक्रमक होतात. एका नेटकऱ्याने लिहले की, आई नेहमी आपल्या मुलाचे गर्भाशयाच्या आत आणि बाहेर संरक्षण करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT