Valentine Day esakal
Trending News

Valentine Day ला गर्लफ्रेंडसाठी गिफ्टची तयारी? उंदराने पळवला हिऱ्यांचा नेकलेस

व्हॅलेनटाइन विक सुरू झाला आहे. त्यामुळे आता गर्लफ्रेंडला काय गिफ्ट द्यायचं याचं सगळ्यांचच प्लॅनिंग जोरात असेल.

सकाळ डिजिटल टीम

Mouse Stole A Diamond Necklace For Mice Viral Video : फेब्रुवारी महिना सुरु झाला की, प्रेमवीरांना सगळं काही गुलाबी गुलाबी दिसायला लागतं. मग आता तर काय व्हॅलेंटाइन विक सुरु झाला आहे. अशात सगळ्यांच गर्लफ्रेंडला काय गिफ्ट द्यायचं याविषयीचं प्लॅनिंग सुरु झालंच असेल. कुठे जायचं, कसा साजरा करायचा, कसं तयार व्हायचं आणि काय गिफ्ट द्यायचं अशा सगळ्याचेच विचार जोरात असतील.

मग गर्लफ्रेंड फक्त तुमची आमचीच असते का? अहो प्रत्येकच बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडसाठी काय गिफ्ट घ्यावं याचं टेंशन येतच की. सगळ्यात बेस्ट गिफ्ट द्यावं असं सगळ्यांनाच वाटतं. त्यातूनच एका उंदराने चक्क हिऱ्यांच्या हाराची चोरी केली...! हो, तुम्ही बरोबरच वाचलंत. उंदराने म्हणे उंदरीणीला व्हॅलेनटाइन गिफ्ट देण्यासाठी सराफ दुकानातून हिऱ्यांच्या हाराची चोरी केली. या विषयीचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

खाण्याच्या वस्तू उंदीर पळवून नेतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आणि काही अंशी ते पटण्यासारखंही आहेच. पण हिऱ्याचा हार का बरं उंदराने पळवला असेल असाच व्हिडीओ बघणाऱ्या प्रत्येकाला पडला. त्यावर काही नेटकऱ्यांनी म्हटलंय उंदरीणीसाठी व्हॅलेंटाइन गिफ्ट म्हणून चोरला असावा. तर काही म्हणताय आता आम्हाला पण उंदीर पाळावे लागतील, उंदरीण फारच डिमांडींग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT