Sanskrit songs Night Club
Sanskrit songs Night Club  esakal
Trending News

Unique Night Club: संस्कृत गाण्यांवर लोकांना थिरकवणारा एकमेव क्लब!

Pooja Karande-Kadam

Sanskrit songs in Night Club: तरूणाईचा रिलॅक्स होण्यासाठीचे फेवरेट ठिकाण म्हणजे नाइट क्लब होय. क्लबमध्ये डान्स, दिल आणि ड्रिंक्स यांची कमतरता नसते.

तिथे लाईट्सचा झगमगाट आणि इंग्लिश गाण्यांचा नाद असतो. त्या इंग्लिश गाण्यांच्या बिटवर बेधुंद होऊन तरूण वर्ग थिरकत असतो. पण, तुम्हाला माहितीय का? एक क्लब असा आहे जिथे संस्कृत गाणी वाजतात.

 काही लोकांच्या मते क्लब ही संस्कृती आपली संस्कृती बिघडवते. ज्यामुळे लोकांच्या, विशेषतः तरुणांच्या मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होतो.

या जगात एक नाईट क्लब देखील आहे ज्याने ही कल्पना चुकीची सिद्ध केली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या नाईट क्लबमध्ये ड्रग्ज दिले जात नाहीत आणि येथे डीजेवर इंग्लिश संगीताचा आवाजही नाही.

इथे सात्विक भोजन आणि संस्कृत गीते वाजवली जातात. ज्यावर लोक भक्तीभावात तल्लीन होऊन नाचू लागतात. अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्समध्ये हा क्लब आहे. ‘योग रेव्ह नाईट क्लब’ असे या क्लबचे नाव आहे.

केवळ देवळात किंवा तीर्थक्षेत्रातच भक्ती केली जाऊ शकते असे ज्यांना वाटत होते. त्यांच्यासाठी ही चपराक ठरणार आहे. कारण, जर तुमच्या मनात देवाबद्दल आदर असेल तर तुम्ही नाचतानाही देवाची भक्ती करू शकता.

क्लबची वैशिष्ट्ये काय आहेत

या आलिशान नाईट क्लबमध्ये संस्कृत गाणी आणि संस्कृत भजनांवर नृत्य केले जाते. त्यासोबत प्राचीन योगशास्त्रानुसार योगासनेही केली जातात. या नाईट क्लबमध्ये अल्कोहोलयुक्त पेये दिली जात नाहीत. त्याऐवजी येथे फळांचे रस दिले जातात.

या क्लबमध्ये एक योग शिक्षक देखील आहे जो लोकांना विविध प्रकारचे योग क्रियाकलाप आणि प्राणायाम आणि आरोग्य टिप्स शिकवतो. या क्लबमध्ये मांसाहाराऐवजी शुद्ध शाकाहारी जेवण दिले जाते. या नाईट क्लबमध्ये 800 ते 1000 लोक एकत्र आनंद घेऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sitapur Murder Case: चिमुरड्यांना छतावरून फेकलं, आईवर झाडली गोळी अन् बायकोला हातोड्यानं..; सीतापुरात 5 जणांची निर्घृण हत्या

SEBI Bans: सेबीची मोठी कारवाई! कंपनीवर घातली बंदी; गुंतवणूकदारांनाही दिला सल्ला, काय आहे प्रकरण?

James Anderson Retirement : ब्रेंडन मॅक्क्युलममुळे इंग्लंडची 41 वर्षाची तोफ थंडावणार, जेम्स अँडरसन कसोटीतून निवृत्त होणार?

Orry: एक फोटो काढण्यासाठी अन् इव्हेंटला हजेरी लावण्यासाठी किती घेतो मानधन? ओरीनं अखेर सांगूनच टाकलं

Narhari zirwal: झिरवाळांकडून महायुतीचा ‘करेक्ट’ कार्यक्रम; महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंच्या व्यासपीठावर हजेरी

SCROLL FOR NEXT