Pakistani Man Sakal
Trending News

Viral Video : पाकिस्तानची परिस्थिती बिकट! विमानातही पोहोचले भिकारी; मदरशाच्या नावावर...

'मी भिकारी नाही पण मदरसा बनवायला पैशांची गरज आहे'

दत्ता लवांडे

सोशल मीडियावर पाकिस्तानी व्यक्तीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो विमानातच लोकांना पैशांची मागणी करताना दिसत आहे. पाकिस्तानामध्ये आर्थिक मंदीचे सावट असताना हा व्यक्ती विमानातील लोकांकडे पैशांची मागणी कशासाठी करत असेल हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल पण या व्यक्तीने सांगितलेले कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

"मी भिकारी नाही पण मदरसा बनवायला पैशांची गरज आहे त्यासाठी मला तुम्ही मदत करा" असं हा व्यक्ती विमानातील प्रवाशांना सांगताना दिसत आहे. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, "पाकिस्तानातील नागरिकांकडे अन्न विकत घेण्यासाठी पैसे नाहीत, सरकारही आर्थिक मदतीसाठी दुसऱ्या देशांकडे मदत मागत असताना हा व्यक्ती मदरशासाठी लोकांकडे पैसे मागतो हे किती खेदजनक आहे, हा विमानाला ट्रेन समजून भीक मागायला आला असेल, ही त्यांच्या पारंपारिक परिस्थिती... आणि यांना पाकिस्तान पाहिजे" अशा प्रकारच्या विनोदी कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

पाकिस्तानात मागच्या काही दिवसांपासून आर्थिक मंदीचे सावट आहे. तेथील नागरिकांना खाण्यासाठी अन्न मिळत नाही. तर अनेक खाद्यपदार्थांचे आणि जीवनोपयोगी वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पाकिस्तानमध्ये पेट्रोल, तेल, धान्य, डाळी अशा वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे लष्कराच्या सुरक्षेत सरकारला धान्यांची वाटप करावी लागली होती. तर खायला अन्न न मिळाल्यामुळे अनेक ठिकाणी वाद झाल्याच्याही घटना पाकिस्तानातून समोर आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Facial Recognition: चेहरा स्कॅन, रिपोर्ट सेकंदात! स्टेशनमध्ये गुन्हेगार शिरताच पकडले जातील; पोलिसांची नवी सिस्टम अॅक्शनमध्ये

Meta ची मोठी कारवाई! १६ वर्षांखालील मुलांचं इंस्टाग्राम-फेसबुक अकाउंट्स १० डिसेंबरपर्यंत कायमची डिलीट होणार, हे आहे कारण

Kalyan crime : हिंदी बोलल्याने मराठी तरुणाला लोकलमध्ये मराठी लोकांची मारहाण, मानसिक तणावातून संपवले जीवन

Maharashtra Leopard : मानव-बिबट संघर्षावर उपाय; नसबंदीसाठी राज्य सरकारचा हिरवा झेंडा!

Tejashwi Yadav Reaction on Nitish Kumar Oath : नितीश कुमारांच्या शपथविधीनंतर तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

SCROLL FOR NEXT