Patrakar Pohewala  esaka
Trending News

Patrakar Pohewala : एचआर टीममूळे पत्रकार बनला पोहेवाला! इथे मिळतात एडीटर ,रिपोर्टर स्पेशल पोहे!

या स्टॉलवर मिळतात दोन प्रकारचे पोहे, त्यांच्या किंमतीही वेगळ्या, काय आहे कारण

सकाळ डिजिटल टीम

आज पर्यंत आपण MBA चाय वाला पासून B.tech पाणीपुरीवाली बद्दल ऐकले आहे. उच्च शिक्षित असूनही मिळूनही या सर्वांनी अशा कामांना आपला व्यवसाय बनवला. ज्यांना लोक नेहमीच लहान समजत आले आहेत.

या क्रमवारीत आणखी एका नावाची भर पडली असून, यावेळी एका पत्रकाराने पोह्याला आपला व्यवसाय बनवून आपल्या व्यवसायाला 'पत्रकार पोहे वाला' असे नाव दिले आहे. जाणून घेऊया काय कारण होते की एका पत्रकाराला पोहे विकायला सुरुवात करावी लागली.

सध्या सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक स्टॉल दिसत आहे, ज्यावर 'पत्रकार पोहेवाला' असे लिहिले आहे. या पोह्यांच्या स्टॉलचे मालक दद्दन विश्वकर्मा हे काम सुरू करण्यापूर्वी पत्रकार होते.

इंदूरचे रहिवासी असलेले 37 वर्षीय विश्वकर्मा यांनी आयआयएमसी म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमधून पत्रकारितेचा अभ्यास केला आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अनेक मोठ्या मीडिया संस्थांमध्ये काम करताना त्यांच्या आयुष्यातील जवळपास 13 वर्षे पत्रकारिता केली आहे.

5 डिसेंबर 2022 रोजी ते ऑफिसमध्ये असताना सायंकाळी पाचच्या सुमारास एचआर टीमने त्यांना भेटण्यासाठी बोलावले. जेव्हा दद्दन एचआरला भेटायला पोहोचले. तेव्हा त्यांना कोणतीही सूचना न देता काढून टाकण्यात आल्याची नोटीस मिळाली. कार्यालयातून मिळालेला लॅपटॉप तातडीने जमा करण्यास सांगितले.

दद्दन विश्वकर्मा यांनी त्यांच्या नवीन व्यवसायाबद्दल पुढे सांगितले की, “पोह्याचा स्टॉल लावण्याची कल्पना त्यांच्या भावाला पाहून त्यांना सुचली. काही वर्षांपूर्वी दद्दन यांनी स्वतःच्या भावासाठी पोह्याचा स्टॉल उघडला होता. नंतर त्याचा भाऊ इंदूरला गेला. आता या कठीण परिस्थितीत हा स्टॉल पुन्हा सुरू करण्याचा विचार विश्वकर्मा यांनी केला. त्यांनी पोह्याचा स्टॉल उघडून त्याला अनोखे नाव दिले.

या दोन अनोख्या पोह्यांबद्दल दद्दन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “कोणत्याही चॅनल किंवा कंपनीमध्ये एडीटरचा पगार चांगला असतो. म्हणूनच एडीटर पोह्यांमध्ये पनीर आणि डाळिंब घातले जाते. त्यांची किंमत 80 रुपये प्लेट आहे. त्यासोबत एक जिलेबी मोफत आहे. त्यांच्या दुसऱ्या प्रकारात दादन इंदूरचे नॉर्मल पोहे देतात. कारण रिपोर्टर्सना कमी पगार मिळतो. त्यामूळे त्यांची किंमत प्रति प्लेट 50 रुपये आहे. यासोबत एक जिलेबीही मोफत मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT