Pune Old Lady Dance Viral Video Esakal
Trending News

Viral Video: "तुम तो धोकेबाज हो..." साठी ओलांडलेल्या आजीबाईंचा ट्रॅक्टरवर चढत डान्स, पुण्यातील मिरवणुकीतील व्हिडिओ व्हायरल

Pune Old Lady Dance Viral Video: राज्यासह देशभरात मोठ्या थाटामाटात पार पडला. काल अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाने गणेशोत्सवाची सांगता झाली.

आशुतोष मसगौंडे

राज्यासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला. काल अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाने गणेशोत्सवाची सांगता झाली.

या सगळ्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकींनी सर्वांचे लक्ष वेधले होते. दरम्यान सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक साठी ओलांडलेल्या आजीबाई ट्रॅक्टरवर चढत डान्स करताना दिसत आहेत. यावेळी आजूबाजूला असलेले लहाण-मोठे स्त्री-पुरुष सगळेच या आजीबाईंना प्रोहत्सान देताना पाहायला मिळत आहेत.

काल विविध मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुकी टिळक चौकातून पुढे गेल्या. दरम्यान येथे एक मंडळाच्या डिजेसमोर साठी ओलांडलेल्या आजीबाईंनी थेट ट्रक्टरवर चढत 'तुम तो धोकेबाज हो...' या गाण्यावर डान्स केला. यावेळी सुरुवातीला या आजी थोड्याश्या अडखळल्या, मात्र लगेचच त्यांनी स्वतःला सावरले आणि पुन्हा डान्स सुरू केला.

यावेळी आजीबाईंना उपस्थित असलेल्या सर्व लहाण-मोठे, स्त्री-पुरुष अशा सर्वांनी प्रोहत्सान देत त्यांचा उत्साह आणखी वाढवला.

गणेश विसर्जन मिरवणुकीत काही अप्रिय घटना

दरम्यान सर्वत्र काल उत्साहाच्या वातावरणात गणेश विसर्जन मिरवणुकी पार पडल्या. मात्र राज्यात काही ठिकाणी अप्रिय घटना घडल्याचेही पाहायला मिळाले.

यामध्ये भिवंडीत विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला होता. तर धुळ्यात मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली चिरडून तीन मुलांचा मृत्यू झाला.

कालच्या विसर्जन मिरवणुकीत राज्यात विविध घटनांमध्ये एकूण 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT