A massive python entered the house unnoticed while kids were engrossed in mobile screens—scene captured on viral video.  esakal
Trending News

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Python and kids Viral video: घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे; पाहिल्यावर तुमच्याही अंगावर नक्कीच काटा येईल.

Mayur Ratnaparkhe

Python Enters Home While Children Watch Mobile: आजकाल सोशल मीडियावर अनेक भन्नाट व्हिडिओ आपण पाहत असतो, मात्र काही व्हिडिओ इतके भयानक असतात की ते पाहिल्यार आपल्याच अंगावर शहारे येतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन लहान मुलं घरासमोरील मोकळ्या जागेत मोबाइल पाहात बसलेली असतात अन् तितक्यात एक महाकाय अजगर त्या घरात येतो.

हा अजगर पाहिल्यावर आपल्यालाच धडकी भरू शकते, परंतु त्या व्हिडिओत असे स्पष्टपणे दिसते की, ती मुलं जराही घाबरत नाहीत. त्यातील एक लहान मुलगा तर उलट त्या अजगराला आपल्याकडे बोलावतो, त्याला प्रेमाने हात लावतो आणि त्याच्याशी खेळतोही. 

त्याचवेळी त्याच्याशेजारी बसलेला दुसरा मुलगा फक्त एक साधा कटाक्ष त्या अजगराकडे टाकतो आणि पुन्हा मोबाईल बघण्यात रममाण होताना दिसतो. जणूकाही घरातील एखादं पाळीव कुत्रंच त्यांच्या अवतोभोवती फिरत आहे आणि त्यांना त्याचं काहीच वाटत नाही.

हा व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या अकाउंटवरून X या सोशल साइटवर शेअर करण्यात आला आहे. जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांच्या विविध प्रतिक्रियाही यावर उमटत आहेत. तर कित्येकांनी त्या मुलांच्या हिंमतीचे कौतुकही केले आहे. तर काहींना हा व्हिडिओ फेक वाटत आहे.

(टीप- या बातमीत दिलेली माहिती ही सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टवर आधारित आहे. सकाळ ऑनलाईन या व्हिडिओ अथवा त्यावर आधारित माहितीची पुष्टी करत नाही.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi-Hindi controversy : मराठी शिकत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही; शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे मोठे विधान

ITI Courses: ‘आयटीआय’मध्ये सहा नवे अभ्यासक्रम; कौशल्य, रोजगारमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

सायना नेहवालचा घटस्फोट, इन्स्टा पोस्टमधून केलं जाहीर; १० वर्षे रिलेशनशिपनंतर लग्न, ७ वर्षांचा संसार

Satara News :'परतीच्या प्रवासात माउली फलटणमध्ये'; मुक्‍कामस्‍थळी आरतीसाठी गर्दी, पालखीसोबत दोन हजार वारकरी

Lonavala Accident: ट्रकमधील पाइप पडून दोन महिला ठार; पाच जखमी, बोरघाटात पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील घटना

SCROLL FOR NEXT