rapido rider pushes bike after customer refuses to step off the bike watch viral video  
Trending News

Rapido Rider : माणुसकी संपली का? पेट्रोल संपल्यावर बाईकवरून उतरण्यास नकार, रॅपिडो चालकाचा गाडी ढकलतानाचा Video Viral

Rapido Rider pushes bike Viral Video : तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथील एक रॅपिडो ड्रायव्हरचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

रोहित कणसे

Rapido Rider pushes bike Viral Video : तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथील एक रॅपिडो ड्रायव्हरचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. एका अॅप बेस्ड बाईक टॅक्सीमधील पेट्रोल संपलं पण प्रवास करणाऱ्या ग्राहकाने बाईकवरून खाली उतरण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ग्राहकाने तो बाईकवर बसलेला असताना या दुचाकी चालकाला दुचाकी पेट्रोल पंपापर्यंत ढकलत नेण्यास भाग पाडलं. दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथील एका रॅपिडो ग्राहकाने एक टू व्हिलर बूक केली होती. बुकिंग झाल्यानंतर बाइक ड्रायव्हर त्या ग्राहकाला घेऊन ग्राहकाला जायचे होते त्या ठिकाणी पोहचवण्यासाठी निघाला देखील. पण अर्ध्यातच बाईकमधील पेट्रोल संपलं. पेट्रोल संपल्याने गाडी रस्त्यात बंद पडली. त्यानंतर त्या ड्रायव्हरने त्या ग्राहकाला पेट्रोल पंपापर्यंत चालत येण्यास सांगितलं, पण ग्राहकाने बाईकवरून खाली उतरण्यास नकार दिला. बाईक ड्रायव्हरने अनेक वेळा विनंती केल्यानंतर देखील ग्राहकाने बाईकवरून खाली उतरण्यास नकार दिला आणि तो गाडीवरच बसून राहिला.

त्यानंतर बाईक ड्रायव्हर बाईकला धक्का देत असताना देखील तो ग्राहक खाली उतरला नाही. दोघे असेच पेट्रोल पंपापर्यंत गेले. दरम्यान बाईकच्या मागे चालच असलेल्या एका ऑटो ड्रायव्हरने या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि नंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओंवर नेटकऱ्यांच्या समीश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT