Trending News

"सिंगल आहेस कामावर ये" बॉसने सुट्टीच्या दिवशी बोलवलं; कर्मचारी म्हणाला, नोटिस पिरेड सुरू झाला | Chat Viral

ही चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सुट्टीच्या दिवशी एका कंपनीतल्या कर्मचारी आणि बॉसमध्ये भांडणे झाल्याचं समोर आलं आहे. या दोघांमधील चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सदर बॉस कर्मचाऱ्याला रविवारी कामावर बोलवत होता. त्यावरून हा वाद वाढत गेल्याचं व्हायरल झालेल्या चॅटिंगवरून दिसत आहे.

दरम्यान, एक बॉस कर्मचाऱ्याला चॅटिंग करताना म्हणतो की, "उद्या तुला काही कारणास्तव सकाळच्या शिफ्टला कामावर यावे लागेल. सकाळी सव्वासहाच्या दरम्यान तू इथे असायला हवा." त्यावर कर्मचारी म्हणतो की, "उद्या माझी आठवड्यातील एकमेव सुट्टी आहे. यादिवशी मी कामावर येऊ शकणार नाही, दुसऱ्या कर्मचाऱ्याला विचारा"

Viral Chatting

कर्मचाऱ्याच्या या उत्तरावर बॉस म्हणाला की, "दुसऱ्यांचे लग्न झालेले आहेत त्यांना मुले आहेत, तू सिंगल आहेस तू उद्या कामावर हजर रहा." त्यानंतर दोघांमधला वाद वाढला. मी प्रामाणिक कामगार आहे, मी तुमचा आदर करतो, तुम्हाला माहितीये मी हार्ड वर्कर आहे, आपण अनेक दिवसांपासून एकत्र काम करत आहोत.

तुम्ही मला मागच्या चार वर्षापासून चांगलंच ओळखता असं म्हणत कर्मचाऱ्याने वाद वाढवला आणि नंतर त्याला बॉसचे बोलणे सहन झाले नाही म्हणून तो म्हणाला की, "आता माझा नोटीस पिरेड सुरू झाला असं समजा." असं त्याने रागारागात त्याच्या बॉसला लिहिलं अन् चॅटिंग संपवली.

या दोघांमधील चॅटिंगचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. तर हा फोटो सोशल मीडियावर अनेकांकडून शेअर केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Women’s World Cup 2025 Ind vs Pak : आज भारत-पाकिस्तान आमनेसामने, महिला खेळाडू हस्तांदोलन करणार?

MPSC 2025: खुल्या प्रवर्गाने परीक्षा द्यायची नाही का? ‘राज्य कर निरीक्षक’ पदासाठी शून्य जागा; विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT