Viral Video
Viral Video SAkal
Trending News

Viral Video : चोर आले, चोरी करून जातानाच भीषण अपघातात मृत्यू; थरारक घटना CCTV मध्ये कैद

सकाळ डिजिटल टीम

"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर" हे भक्तीगीत आपण अनेकदा ऐकलं असेल. आपण वाईट वागलो तर आपल्याला त्याचे फळ मिळतेच, त्यामुळे वाईट कृत्य करायचं नाही, सर्वांशी नीट वागायचं हे आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक अपघात झाल्याचं आपल्याला दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील असून त्यामध्ये दोन चोर दुचाकीवरून येतात आणि रस्त्याने जात असलेल्या काही लोकांना अडवतात. त्यानंतर ते चाकू किंवा बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडून मौल्यवान वस्तू चोरतात आणि लगेच निघून जातात.

पण जात असताना पाठीमागून येत असलेली गाडी दुचाकीला धडक देते आणि त्यामध्ये दोन चोर उडून खाली पडतात. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर त्यांच्या कृत्याचे फळ त्यांना लगेच मिळाले आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या चोरांना आपल्या कृत्याचं चांगलच फळ मिळालं अशी कमेंट नेटकऱ्यांनी केल्या असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

Udayanraje Bhosale : यशवंतराव चव्‍हाण यांना भारतरत्‍न द्या ; उदयनराजे, कऱ्हाडच्या सभेत मोदींना देणार निवेदन

MS Dhoni Cyber Scam : 'मी वावरात आहे, पाकीट घरी विसरलोय, 600 रूपये पाठव...' धोनीचा मेसेज आला असेल तर सावधान! Scam Alert

Loksabha Election: उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस? नाराजांना गळाला लावण्याचे भाजपकडून प्रयत्न

SCROLL FOR NEXT