Viral Video
Viral Video Sakal
Trending News

Viral Video : वयावर जाऊ नका! दोन म्हाताऱ्यांची फ्री स्टाईल हाणामारी; घटना CCTV मध्ये कैद

सकाळ डिजिटल टीम

काही लोकं खूप भांडखोर असतात. त्यांना भांडण करायला फक्त छोट कारण पुरेसं असतं. तर अनेकजण एखाद्याकडून चुकी झाली तरी मोठ्या मनाने माफ करतात. सध्या दोन भांडखोर म्हाताऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांची फ्री स्टाईल हाणामारी चाललेली दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. तर ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये एका दुचाकीला दुसऱ्या दुचाकीचा धक्का लागतो आणि त्यातून त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतात. या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीमध्ये होते. दोघेही एकमेकांना लाथाबुक्क्यानी मारहाण करतात.

दरम्यान, त्यांनी एकमेकांचे पाय ओढून जबर मारहाण केली आहे. तर ही घटना गल्लीमध्ये घडल्यामुळे इथे कुणी व्यक्तीही दिसत नाही. त्यांच्या भांडणामध्ये मध्यस्थी करण्यासाठी कुणीही आलेलं दिसत नाही. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. "या म्हाताऱ्या व्यक्तींच्या वयावर जाऊ नका त्यांच्यामध्ये अजूनही भांडण करण्याची उर्मी आहे." अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT