UP Police Esakal
Trending News

UP Police: ‘पंचवीस चपात्या खाऊन झोप आली’; ट्रेनींगमध्ये डुलकी काढणाऱ्या कॉन्स्टेबलचे स्पष्टीकरण !

पण, ट्रेनिंग बेसवर असलेल्या एका हेड कॉन्स्टेबल ट्रेनिंग सुरू असताना डुलकी लागण्याचे भलतेच कारण दिले आहे.

सकाळ डिजिटल टीम

शाळेत वर्ग सुरू असताना किंवा आईच्या आग्रहास्तव नाटक पहायला गेल्यावर डुलकी येतेच. त्यावर शाळेत आपण सकाळी लवकर उठलो म्हणून किंवा नाटक कंटाळवाणे होते त्यामुळे झोपलो असे कारण देतो. पण, ट्रेनिंग बेसवर असलेल्या एका हेड कॉन्स्टेबल ट्रेनिंग सुरू असताना डुलकी लागण्याचे भलतेच कारण दिले आहे. त्याचे हे कारण सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. उत्तरप्रदेशमधील सुलतानपूरमधील ट्रेनींगवर असलेले हेड कॉन्स्टेबल राम शरीफ यादव मागील सोमवारी वर्गात झोपले होते. हे पाहील्यावर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला झापले आणि त्याचे स्पष्टीकरण मागितले. 

ट्रेनींगसेंटरच्या मुख्य  अधिकाऱ्यांनी हेड कॉन्स्टेबल राम यांना विचारले होते की, 10 ऑक्टोबरला तुम्ही वर्गात झोपा काढत होता. तूमच्या या कृत्यामुळे सेंटरच्या शिस्तीचा भंग होतो. हे निष्काळजीपणाचे लक्षण आहे. यामुळे आपल्या सेंटरच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचू शकतो. या संदर्भात तुमचे स्पष्टीकरण द्या.

यावर हेड कॉन्स्टेबल राम शरीफ यादव यांनी असे काही उत्तर दिले की ते वाचून सगळेच चक्रावून गेलेत. ‘मी लखनऊ येथून प्रशिक्षणासाठी पीटीसी दादूपूरला येण्यासाठी निघालो. मला इथे पोहोचायला उशीर झाला त्यामुळे मी फार काही न खाता झोपी गेलो. रात्री मी जेवलो नाही त्यामुळे ट्रेनिंग आधी मी भरपेट जेवलो. सकाळच्या जेवणात मी 25 चपाती, एक ताटभर भात, दोन वाट्या आमटी आणि एक वाटी भाजी खाल्ली. या एवढ्या जेवणाने मला सुस्ती आली आणि मी झोपलो. इथून पूढे मी काळजी घेईन, एवढे जेवण जेवणार नाही, असे सांगत राम शरीफ यांनी माफी मागितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Elections: घड्याळासोबत जावं ही कार्यकर्त्यांची इच्छा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; रोहित पवारांनी केलं शिक्कामोर्तब

एर्नाकुलम एक्सप्रेसच्या २ डब्यांना भीषण आग, दुर्घटनेत एकाचा मृत्यू; VIDEO VIRAL

साऊथ सुपरस्टार थलपती विजयने केली निवृत्तीची घोषणा, 'जय नायकन' शेवटचा सिनेमा असणार, म्हणाला...

Gold Rate Today : आठवड्यात पहिल्यांदा सोन्याच्या भावात घसरण; चांदीही सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त; काय आहे तुमच्या शहरातील आजचे भाव?

Maharashtra Cold Wave : हुडहुडी भरवणारी थंडी! महाराष्ट्रात पारा घसरला, विदर्भातील तापमान १० अंशाच्याही खाली...

SCROLL FOR NEXT