Viral Video Chitrakot Waterfall Girl Attempt esakal
Trending News

Viral Video : 100 फुट खोल धबधब्यात मारली उडी! कारण ऐकून बसेल धक्का

सोशल मीडियावर पावसाचे व्हायरल झालेले व्हिडिओ लक्ष वेधून घेत आहेत. त्यातच एका व्हिडिओनं खळबळ उडवून दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Viral Video Chitrakot Waterfall Girl Attempt : देशभरामध्ये सध्या पावसानं हाहाकार केला आहे.त्यामुळे अनेकजण विस्थापित झाले आहे. उत्तर भारतात पावसानं केलेलं तांडव काळजाचा थरकाप उडवणारं आहे. दुसरीकडे गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये देखील पावसानं परिस्थिती गंभीर केली आहे. कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रायगड, सातारा, या जिल्ह्यांमध्ये पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

सोशल मीडियावर पावसाचे व्हायरल झालेले व्हिडिओ लक्ष वेधून घेत आहेत. त्यातच एका व्हिडिओनं खळबळ उडवून दिली आहे. त्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलीनं शंभर फुट धबधब्यात उडी मारली आहे. तो व्हिडिओ पाहून अनेकांना मोठा धक्काच बसला आहे. चित्रकोट मधील त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे की, तिनं हे कृत्य का केले.. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ती तरुणी या प्रसंगातून सुखरुप बचावली आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

गेल्या काही वर्षांपासून चित्रकोटमधील तो धबधबा हा अपघाताचे केंद्र होताना दिसतो आहे. अनेक जीवघेण्या घटना याठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक पोलिसांचा बंदोबस्तही येथे असतो. हजारो पर्यटकांची गर्दी हा धबधबा पाहण्यासाठी होत असते. बाहेरच्या राज्यातून देखील पर्यटक मोठ्या संख्येनं चित्रकोटला भेट देतात.

हाती आलेल्या माहितीनुसार, त्या मुलीला मोबाईल फोन न दिल्यानं तिनं हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.तिला सेल्फी काढण्यासाठी फोन हवा होता. तिला तो न दिल्यानं तिनं रागात हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. पर्यटकांनी याठिकाणी आणखी बंदोबस्त वाढविण्याची मागणी स्थानिक पोलिसांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर भाविकांची मोठी गर्दी

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

IndiGo flight technical glitch: कोचीहून अबुधाबीला १८० प्रवाशांसह निघालेल्या इंडिगो विमानात उद्भवला तांत्रिक बिघाड अन् मग...

"नागरिकांच्या जीवाची किंमत आहे का ?" टेस्ला कार घेतल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांना अभिनेत्याचा सवाल, "एवढा पैसा कुठून आला ?"

Shocking! माथेफिरू तरुणाने चाव्या हिसकावल्या, प्रवाशांनी भरलेली बस सुरू केली अन्...; अनेकांना चिरडले

SCROLL FOR NEXT