A British couple’s playful debate — “Why is the Taj Mahal in India?” — goes viral, delighting millions across social media platforms.

 

esakal

Trending News

British Couple Viral Video : ताजमहल भारतातच का आहे? , नवऱ्याच्या प्रश्नावर पत्नीचंही हटके उत्तर; ब्रिटीश दाम्पत्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल

British Couple Viral Video on Taj Mahal : नवऱ्याने अचानक विचारलेल्या या प्रश्नावर पत्नीने निरागसपणे दिलेलं उत्तर ऐकूण तुम्हालाही नाही आवरणार हसू.

Mayur Ratnaparkhe

Watch the viral video Why is Taj Mahal in India? : ब्रिटीश दाम्पत्याचा व्हिडिओ सोशली मीडियावर व्हायरल; तुम्हालाही हसू आवरणार नाही.सोशल मीडियावर कधी कोणती बातमी किंवा व्हिडिओ व्हायरल होईल, हे कुणालाच सांगता येणार नाही. मग ते व्हिडिओ कधी भारतातील असतात तर कधी भारताबाहेरीलही असतात, कधी भारतीयांचे असतात तर कधी परदेशी नागरिकांचेही असतात. पण त्या व्हिडिओंना पाहणाऱ्यांची संख्या ही मोठ्याप्रमाणात असते. आता आग्रा येथे ताजमहल पाहण्यासाठी आलेल्या ब्रिटीश दाम्पत्याचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत आपल्याला दिसते की, ताजमहल परिसरात हे दाम्पत्य फिरत असताना अचानक पती पत्नीला विचारतो की, ताजमहल फक्त भारतातच का आहे? नवऱ्याने विचारलेल्या या प्रश्नावर पत्नीनेही क्षणाचा विलंब न करता त्याला हटके उत्तर दिलं, जे ऐकायल्यावर तुम्हाला हसू आवरणार नाही.

नवऱ्याच्या प्रश्नावर पत्नी अगदी निरागसपणे म्हणते, कारण, ‘’तो ब्रिटनला घेऊन जाणे खूप अवघड आहे. जर तो हलका असता तर ब्रिटिशांनी तोही सोबत नेला असता.’’ आपल्या सौभाग्यवतीच्या या उत्तराने पतीदेव थक्क झाले आणि त्यांनाही तिचं उत्तर पटलं. त्याने पत्नीला आपण सहमत असल्याचंही म्हटलं.

या ब्रिटिश दाम्पत्याचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. पत्नीच्या या उत्तराला अनेकांनी विनोदी म्हटलय, तर काहींनी या उत्तरामधून ब्रिटिशांनी भारताच्या केलेल्या लूटीचा पुरावा मिळतो असंही म्हटलं आहे. याशिवाय, काहीजणांनी हा व्हिडिओ जाणूनबुजून अशाप्रकारे तयार केल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Criminal Law: विवाहपूर्व संबंध ठेवणे; सरकारवर टीका करणे गुन्हा ठरणार, नवा कायदा लागू, नव्या तरतुदींमुळे मोठी उलथापालथ

Alandi Accident : विजय स्तंभ मानवंदनेसाठी निघाले; अन् आळंदी-मरकळ रस्त्यावर जीप झाली पलटी; 28 जण जखमी!

KDMC Election: शिंदेसेनेने डोंबिवलीत खाते उघडले! कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा तिहेरी बिनविरोध विजय

January Horoscope 2026: जानेवारी महिन्यात कोणत्या राशींवर राहणार रोचक राजयोग? टॅरो कार्ड्सनुसार जाणून घ्या तुमचं राशिभविष्य

Viral Video : पठ्ठ्याने भररस्त्यात पेट्रोल ओतून जाळली रिक्षा, पत्नी अडवत ओक्साबोक्सी रडली तरीही थांबला नाही... धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT