Video elephant giving birth on rail track Train driver saves both esakal
Trending News

Video : रेल्वे रुळावर हत्तीणीनं दिला बाळाला जन्म, अचानक समोरून ट्रेन आली अन् पुढे जे घडलं...; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Video elephant giving birth on rail track Train driver saves both : झारखंडमध्ये रेल्वे रुळांवर प्रसूतीच्या वेदनांमध्ये असलेल्या हत्तीणीसाठी ट्रेन थांबवणारा चालक आज ‘नायक’ ठरला. आई-बाळाची सुरक्षितता जपत घेतलेला हा निर्णय आज हजारो हृदयं जिंकतोय.

Saisimran Ghashi

थोडक्यात..

  • झारखंडमध्ये हत्तीणीनं रेल्वे रुळावर बाळाला जन्म दिला.

  • ट्रेन चालकाने वेळेवर ट्रेन थांबवून दोघांचे प्राण वाचवले.

  • या घटनेचं पर्यावरण मंत्रालयानेही कौतुक केलं.

Viral Video : एकीकडे मानव-प्राणी संघर्षाच्या बातम्या नेहमीच ऐकायला मिळतात, पण सध्या सोशल मीडियावर एका अनोख्या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये माणुसकी आणि संवेदनशीलतेचं एक अत्यंत हृदयस्पर्शी उदाहरण पाहायला मिळतंय. ही घटना झारखंडमधील असून, रेल्वे रुळांवरच एका हत्तीणीने आपल्या पिल्लाला जन्म दिला आणि तिच्या या खास क्षणात एक ट्रेन चालक नायक ठरला.

ही घटना झारखंडमधील एका जंगलात घडली. हत्तीण गर्भवती असताना अचानक तिला बाळंतपण सुरु झाले आणि ती थेट रेल्वे रुळांवरच थांबली. त्या क्षणी एका ट्रेनने त्याच मार्गावरून येताना ही दृश्य पाहिलं आणि प्रसंगावधान राखत ट्रेनचे चालक तात्काळ ट्रेन थांबवतात. केवळ इतकेच नाही, तर त्यांनी तब्बल दोन तास तिथेच थांबून राहिला

या घटनेचा व्हिडीओ केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्वतः आपल्या अधिकृत X (ट्विटर) खात्यावरून शेअर केला आहे. त्यांनी लिहिलं आहे, "मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्षांव्यतिरिक्त, त्यांच्यातील नात्याचं हे एक सुंदर उदाहरण आहे. झारखंडच्या वन अधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेचं विशेष कौतुक!"

व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतं की, पिल्लू जन्मल्यानंतर हत्तीण आपल्या बाळासह शांतपणे जंगलाच्या दिशेने निघून जाते आणि तिच्या मागे ट्रेन पुन्हा सुरू होते. या घटनेमुळे ट्रेन काही काळासाठी उशिरा पोहोचली असली तरी हजारो लोकांच्या मनात या चालकाने माणुसकीची आठवण जागवली.

या घटनेमुळे अजून एक महत्त्वाची गोष्ट पुढे आली आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय तसेच रेल्वे मंत्रालयाने एकत्र येत देशभरात ३५०० किमी पेक्षा अधिक रेल्वेमार्गांचे सर्वेक्षण केले असून, यातून ११० पेक्षा अधिक संवेदनशील ठिकाणांची नोंद घेण्यात आली आहे. अशा उपक्रमांमुळे प्राणी आणि मानव यांच्यातील सहअस्तित्वाची आशा अधिक बळकट होताना दिसते.

ही घटना केवळ एक हृदयस्पर्शी प्रसंग नसून, मानवी संवेदनशीलतेचा आणि निसर्गाशी जोडलेल्या नात्याचा जिवंत पुरावा आहे. आज जिथे प्रगतीच्या नावाखाली जंगलं नाहीशी होत आहेत, तिथे अशा कृतीतून एक सकारात्मक आशा निर्माण होते की, माणूस आणि निसर्ग एकत्र नांदू शकतात जर इच्छाशक्ती असेल तर..

FAQs

  1. ही घटना कुठे घडली?
    झारखंडमधील एका जंगलामध्ये ही घटना घडली.

  2. हत्तीणीनं बाळाला कुठे जन्म दिला?
    रेल्वेच्या रुळांवरच हत्तीणीनं आपल्या पिल्लाला जन्म दिला.

  3. ट्रेन चालकाने काय केलं?
    ट्रेन चालकाने वेळेवर ट्रेन थांबवून दोन तास थांबले आणि हत्तीणीला सुरक्षितपणे बाळंतपण पार पाडू दिलं.

  4. या घटनेबाबत पर्यावरण मंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली?
    त्यांनी मानव आणि प्राण्यांमधील सहअस्तित्वाचं हे सुंदर उदाहरण असल्याचं म्हटलं आणि वन अधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेचं कौतुक केलं.

IND vs ENG 3rd Test: अरे पळ, घे चेंडू खाली ठेवतो...! रवींद्र जडेजाने दिलेली खुली ऑफर, पण जो रूट निघाला 'शहाणा'; Video Viral

Jasprit Bumrah : Video - बुमराहने असाकाही भन्नाट बॉल टाकला, की जगातील तो टॉपचा बॅट्समनही त्याचा ‘बोल्ड’ पाहतच राहिला!

IND vs ENG 3rd Test: जो रूटने वाढवली भारताची चिंता! अनपेक्षित पाहुण्यांमुळे सारेच हैराण, पहिल्या दिवशी इंग्लंडचे वर्चस्व

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजने बॉल फेकून मारलाच होता, जो रूटवर खवळला; नेमकं काय घडलं?

Radhika Yadav: 'तो' वाद अन्...; टेनिस खेळाडू राधिका यादवला वडिलांनी का संपवलं? पोलिसांनी खरं कारण सांगितलं!

SCROLL FOR NEXT