Kartik Vajir Sakal
Trending News

Kartik Vajir : लोकशाहीवर भाषण ठोकून Viral झालेला 'तो' चिमुकला कोण?

त्याच्या विनोदी भाषणाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे.

सकाळ डिजिटल टीम

दोन दिवसांपूर्वी शाळेतील एका लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळेत ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात विनोदी भाषण करत त्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. "आजपासून भारतात लोकशाही लागू झाली असून आपण लोकशाहीमध्ये काहीही करू शकतो. मला तर मोक्कार धिंगाणा करायला आवडतं" अशा भाषणामुळे त्याने लोकांना अक्षरश: पोट धरून हसायला लावलं होतं.

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

कार्तिक वजीर असं या चिमुकल्याचं नाव असून तो जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असल्याची माहिती आहे. या शाळेतील तो पहिलीचा विद्यार्थी असून त्याचे वडील शेतकरी आहेत. त्याच्या घरची परिस्थितीही बिकट असून तो लहानपणापासून खोडकर असल्याची माहिती आहे. त्याला रातांधळेपणा हा आजार असल्यामुळे त्याला दिसायला कमी आहे. त्यामुळे तो वर्गात फळ्याच्या जवळ बसतो. तर तो दिसायला गोरा असल्यामुळे त्याला सर्वजण भुऱ्या या नावाने चिडवतात अशी माहिती मिळाली आहे.

Kartik Vajir

शिक्षकाने लिहून दिलं होतं भाषण

सुरूवातील त्याला प्रजासत्ताक दिनी भाषण करण्याची संधी देण्यात आली नव्हती पण त्याच्या हट्टामुळे त्याला नंतर संधी देण्यात आली. त्याच्या शिक्षकाने त्याला भाषण लिहून दिले होते. भारत मस्के असं त्याच्या शिक्षकाचं नाव असून त्यांनी त्याच्या बहिणीकडून कार्तिकच्या भाषणाची तयारी करून घेतल्याची माहिती आहे. तर त्याच्या रातांधळेपणाच्या आजारावर लवकरात लवकर उपचार व्हायला हवेत असं मत त्याच्या शिक्षकाने व्यक्त केले आहेत.

त्याने भाषणात काय म्हटलं होतं?

"लोकशाही असल्यामुळे मी खेळतो, मोक्कार धिंगाणा करतो, माकडासारखा झाडावर चढतो तर लोकशाही असल्यामुळे मला माझे वडील काहीच बोलत नाहीत. पण काही मुलं माझं नाव शाळेतील सरांना सांगतात आणि काही जण जसं लोकशाहीला पायदळी तुडवतात तसंच सर देखील मला पायदळी तुडवतात. पण मी खूप गरिब आहे, माझ्याएवढा गरिब अख्ख्या तालुक्यात कुणीच नसेल" अशा शब्दांत भाषण करत त्याने अक्षरश: प्रेक्षकांची मने जिंकली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT