Police Inspector A. along with the arrested gamblers. S. Agarkar and Associates. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : शिरपूर येथे मटकाअड्ड्यावर छापा; 10 संशयितांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : शहरातील मेन रोडलगत बंद खोलीत सुरू असलेल्या मटकाअड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी अड्ड्याच्या मालकासह दहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. ७ डिसेंबरला सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

कारवाईत रोकड, मटक्याचे साहित्य आदी मिळून ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.(10 suspects arrested in raid on Matka Adda in Shirpur dhule crime news)

शहरातील पाचकंदील चौकातून बालाजी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या इमारतीत बंद खोलीत मटका खेळविला जात होता. त्याबाबत पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर यांना माहिती मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह छापा टाकला. इमारतीच्या वरच्या मजल्यावरील दोन बंद खोल्यांमध्ये अड्ड्याचा मालक दीपक सुरेश अग्रवाल दहा जणांसह मटका खेळवत असल्याचे आढळले.

संशयितांकडून तीन हजार २४० रुपये रोख, ३५ हजार रुपये किमतीचे सात अँड्रॉइड मोबाईल, आठ लहान मोबाईल, दोन प्रिंटर, पॅड, पेन, कॅल्क्युलेटरसह मटक्याच्या चिठ्ठ्या असा ४९ हजार ३७८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, शोधपथकाचे हवालदार ललित पाटील, पोलिस नाईक रवींद्र आखडमल, योगेश दाभाडे, प्रशांत पवार, हवालदार जाधव, सोनवणे, मनोज बागूल व पंकज पाटील यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT