leopard attack esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Leopard Attack : बिबट्याचा हल्ल्यात 10 वर्षीय बालकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Leopard Attack : दलेलपूर (ता. तळोदा) येथील शेतात आजोबांबरोबर गेलेल्या दहावर्षीय बालकावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.

वन विभागाने यापूर्वीच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले असते तर निरपराध बालकाला आपले प्राण गमवावे लागले नसते, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. (10 year boy died in leopard attack nandurbar news)

दलेलपूर शिवारात गुलाब धानका व दामू धानका यांचे शेत असून, सध्या पावसाने उघडीप दिली असल्याने शेतात विविध कामे सुरू आहेत. शेतमजूर खेत्या वसावे हे नातू गुरुदेव वसावे (वय १०) याला सोबत घेऊन बुधवारी (ता. १६) श्री. धानका यांच्या शेतात कामासाठी गेले. शेतात काम करीत असताना दुपारी बाराच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने गुरुदेव वसावे याच्यावर हल्ला केला.

जवळच असलेल्या त्यांच्या आजोबांनी हे दृश्य पाहून आरडा-ओरड केली. स्वत:च्या जीवाची परवा न करता बैल हाकण्यासाठी जवळ असलेल्या काठीने बिबट्याला मारून त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. खेत्या वसावे यांनी भरपूर प्रयत्न केल्यावर बिबट्या तेथून गेला. मात्र, तोपर्यंत बिबट्याने बालकाच्या मानेवर, गालावर प्राणघातक चावा घेतला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

घटनेची माहिती समजताच ग्रामस्थ घटनास्थळी आले व त्यांनी वन विभागाला माहिती कळवली. वनक्षेत्रपाल स्वप्नील भामरे, वनपाल वासुदेव माळी, वनरक्षक जान्या पाडवी, राहुल कोकणी, आशुतोष पावरा आदींसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

ग्रामस्थांनी वन विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. रक्तस्राव अधिक होत असल्याने बालकास उपचारांसाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून बालकाचा जागीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

बिबट्यांच्या संख्येत मोठी वाढ

तळोदा शहर व तालुक्यातील मोड, बोरद, गुंजाळी, चिनोदा, रांझणी, प्रतापपूर, काजीपूर, दलेलपूर तसेच आसपासच्या परिसरात नेहमीच बिबट्यांचे दर्शन होते. मागील काही घटनांवरून बिबट्यांची संख्या तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसून येते. बिबट्यांची नेमकी संख्या कळण्यासाठी वन विभागाने विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT