BJP Dhule taluka president Devendra Patil, youth leaders Utkarsh Patil, Shyam Patil and Sharad Patil gave a statement on Thursday to include Disaster and Management Minister Anil Patil in Dhule district drought. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Drought News : जिल्ह्यातील 28 महसूल मंडळांचा नव्याने दुष्काळात समावेश

सकाळ वृत्तसेवा

Dhule Drought News : राज्यातील दुष्काळ स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरीक्त उर्वरित ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली. यात धुळे जिल्ह्यातील २८ महसूल मंडळांतील गावांचा समावेश करण्यात आला आहे.

दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार असल्याचा निर्णय मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापनमंत्री अनिल पाटील घेतला.(28 revenue board in district newly included in drought dhule news )

धुळे जिल्ह्यातील ७५ टक्क्यांपेक्षा कमी आणि ७५० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडलेला आहे, असा निकष लक्षात घेऊन तीन तालुक्यांतील २८ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून, दुष्काळग्रस्तांच्या सवलती लागू झाल्या आहेत. नव्याने अस्तित्वात आलेल्या महसुली मंडळांना जुन्या मंडळांचाच निर्णय लागू करण्यात आला आहे.

दरम्यान, यापूर्वी महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णय ३१ ऑक्टोबर २०२३ अन्वये धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यामधील १० महसूल मंडळांना दुष्काळ घोषित करण्यात आला होता. आताच्या निर्णयाने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

दुष्काळात समाविष्ट नवीन मंडळे तालुकानिहाय :

धुळे : धुळे शहर, आर्वी, सोनगीर, नगाव बुद्रुक, फागणे, मुकटी, धुळे ग्रामीण, कुसुंबा, नेर म., लामकानी, शिरूड व बोरकुंड.

साक्री : म्हसदी प्र., दुसाने, निजामपूर, ब्राह्मणवेल, पिंपळनेर, उमरपाटा, दहिवेल, साक्री व कासारे.

शिरपूर : शिरपूर, बोराडी, अर्थे, जवखेडा, होळनांथे व थाळनेर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhiwandi: कारवाई न करण्यासाठी लाच मागितली; माहिती मिळताच ACB चा सापळा, ठाण्यातील मोठा अधिकारी अटकेत

MRP Protest Delhi: एमआरपीतील त्रुटींविरोधात जंतर-मंतरवर राष्ट्रीय आंदोलन; महाराष्ट्रातून ५०० कार्यकर्ते नवी दिल्लीत रवाना

Latest Marathi News Live Update : ‘काळा पैसा आणि कर आकारणी कायद्या’अंतर्गत अनिल अंबानींविरुद्ध कठोर कारवाई न करण्याचे निर्देश

Military Helicopter Crash: लष्करी हवाई दलाचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले! पाकिस्तानमध्ये २१ सैनिकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

आमिर खानच्या सावत्र भावासोबत लग्न करून फसली; 'रेडी' फेम अभिनेत्रीने सहन केला अत्याचार, म्हणाली- लग्नानंतर सगळं बदललं

SCROLL FOR NEXT