003Court_Decision_h_8_0_3.jpg
003Court_Decision_h_8_0_3.jpg 
उत्तर महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी 3 वर्षे शिक्षा 

सकाळवृत्तसेवा

नाशिक : 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर प्रेम करण्यासाठी जबरदस्ती करणारा व भररस्त्यात अडवून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायधीश सूर्यकांत शिंदे यांनी 3 वर्षे सक्तमजुरी व 2 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. अनिल महादेव रणशूर (21, रा. खवणपिंप्री, ता. सेलू, जि. परभणी) असे आरोपीचे नाव असून सदरची घटना 6 एप्रिल 2015 ला वेदमंदिरासमोर घडली होती. 

पीडित 13 वर्षीय मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सरकारवाडा पोलिसात पोस्को व विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. आरोपी अनिल रणशूर याने सातत्याने पिडित मुलीचा पाठलाग करून एकतर्फी प्रेमातून प्रेम करण्यासाठी दमदाटी करीत होता. 6 एप्रिल 2015 ला त्याने पीडित मुलीला वेदमंदिरासमोर अडविले आणि तिला बळजबरीने फिरायला येण्यासाठी धमकावत होता. तिने नकार दिला असता, अश्‍लिल चाळे करीत तिचा विनयभंग केला. तसेच, यापूर्वीही त्याने अनेकदा तिचा पाठलाग केला आणि तिच्या पालकांनाही फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होऊन त्यास अटक करण्यात आली. 

याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायधीश सूर्यकांत शिंदे यांच्यासमोर खटला चालला. यावेळी सरकारी पक्षातर्फे अॅड. शिरिष कडवे यांनी बाजू मांडताना 7 साक्षीदार तपासले. पीडित व तिच्या पालकांसह तपासी अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. त्याआधारे आरोप सिद्ध झाल्याने आरोपी रणशूर यास 3 वर्षे सक्तमजुरी व 2 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी वकील अॅड. कापसे यांनीही या खटल्याचे कामकाज पाहिले होते. तर, सरकारवाड्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीमती बेलेकर यांनी तपास केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT