Matruvandana Yojana esakal
उत्तर महाराष्ट्र

Matruvandana Yojana : 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरदरम्यान लाभार्थ्यांची नोंदणीसाठी विशेष मोहीम

सकाळ वृत्तसेवा

Matruvandana Yojana : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी जिल्ह्यात ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२३ दरम्यान ऑनलाइन लाभार्थी नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी दिली.( 30 November to 1 December Special campaign for registration of matruvandana yojana dhule news)

माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे आणि मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केली आहे.

या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी धुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सर्व आरोग्यसेवा कार्यक्षेत्रांमध्ये ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन लाभार्थी नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. ही योजना शहरी व ग्रामीण भागामध्ये लागू करण्यात आली आहे. ही योजना शासकीय सेवेत असणाऱ्या माता वगळून इतर सर्व मातांना देय आहे.

प्रथम व द्वितीय योजना

पहिल्या अपत्यासाठी गर्भवती व स्तनदा माता यांना डीबीटीद्वारे मातेच्या बँक, पोस्ट खात्यात पाच हजार रुपये दोन हप्त्यांत जमा करण्यात येतात. प्रथम हप्ता तीन हजार रुपये असून, यासाठी मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या (१८० दिवस) आत राज्य शासनाकडून मान्यताप्राप्त आरोग्य संस्थांमध्ये गरोदरपणाची नोंदणी व किमान एक प्रसूतिपूर्व तपासणी करून देणे आवश्यक आहे.

दुसरा हप्ता दोन हजार रुपये हे बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र, तसेच बाळास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी व हिपॅटायटिस बी किंवा समकक्ष प्राथमिक लसीकरण मिळाल्यानंतर देण्यात येतो. द्वितीय योजनेत दुसरे अपत्य मुलगी असल्यास एकाच टप्प्यात सहा हजार रुपयांचा लाभ बाळाचे जन्मनोंदणी प्रमाणपत्र, तसेच बाळास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी व हिपॅटायटिस बी किंवा समकक्ष प्राथमिक लसीकरण मिळाल्यानंतर देण्यात येतो.

लाभाचे आवाहन

धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‍जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, ‍जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. एन. देगावकर, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन बोडके, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. तरन्नुम पटेल यांनी केले आहे.

लाभासाठी निकष

वरील दोन्ही योजनांमध्ये लाभार्थ्यांनी पुढील निकषांपैकी एक निकष पूर्ण करणे आवश्यक आहे व त्याचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील.

महिलेचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष आठ लाखांपेक्षा कमी असावे, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या महिला, ज्या महिला अंशत: ४० टक्के किंवा पूर्ण दिव्यांग आहेत, बीपीएल शिधा पत्रिकाधारक महिला, आयुष्मान भारतअंतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत महिला लाभार्थी, ई-श्रम कार्डधारक महिला, किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी, मनरेगा जॉबकार्ड घेतलेल्या महिला, गर्भवती व स्तनपान करणाऱ्या अंगणवाडीसेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती, शिधापत्रिकेमध्ये लाभार्थी मातेचे नाव असलेल्या महिला लाभार्थी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indigo Emergency Landing : अहमदाबाद विमानतळावर 'इंडिगो' विमानाचे आपत्कालीन लँडिंग; बॉम्बच्या धमकीने उडाली खळबळ!

Jalgaon Crime : इन्स्टाग्राम' रीलवरील शिवीगाळ जीवावर बेतली; जळगावात १८ वर्षीय तरुणाची पाळत ठेवून हत्या, सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : दत्तजयंती, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या संगमाला सुपरमून, आकाशात दुर्मिळ असा तेजस्वी चंद्र दिसणार

Sarangkheda News : सारंगखेडा अश्‍व बाजारात घोड्यांच्या खरेदी-विक्रीला प्रारंभ; दौंडचे आमदार राहुल कुल यांनी ११ लाखांच्या घोडीची केली 'बोहनी'

19-minute viral video : १९ मिनिटांच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओची लिंक ओपन करताच तुमच्यासोबत होईल मोठे कांड, आयुष्यभर करावा लागेल पश्चाताप

SCROLL FOR NEXT