Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : भूमिगत गटारीसाठी 45 कोटींचा निधी मंजुर

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील देवपूर भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिकेतर्फे भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. ते निधी आणि कामातील गुणवत्तेअभावी रखडले. (45 crore fund for underground sewers received administrative approval dhule news)

याविषयी टीकेची झोड उठल्यानंतर उशिरा का होईना उर्वरित कामांसाठी ४५ कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे रखडलेल्या भूमिगत गटारीचे काम मार्गी लागण्यास मदत होईल. मात्र, योजनेच्या कामात गुणवत्ता राखली जात नसल्याने याविषयी प्रश्‍नचिन्ह कायम आहे.

केंद्र सरकार पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत भूमिगत गटारीचे काम सुरू आहे. ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियंत्रणात होत आहे. महापालिका सहनियंत्रक एजन्सी आहे. या योजनेंतर्गत निधीअभावी पहिल्या टप्प्यातील काम अपूर्ण होते.

यात वाढीव मेन होल, प्रॉपर्टी चेंबर, जीएसटी रक्कम, रोड क्रॉसिंग अशी कामे होऊ शकली नाहीत. निधीची मागणी करत गुजरातच्या ठेकेदार कंपनीने पलायन केले. त्यामुळे वर्ष-दीड वर्षापासून योजनेचे काम रखडले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

असा असेल वाटा

आर्थिक स्थितीअभावी उर्वरित कामांसाठी खर्च पेलणे महापालिकेला अशक्य झाले. त्यामुळे भूमिगत गटार योजनेच्या उर्वरित कामांसाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, असा ठराव महासभेत झाला होता. नंतर हा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी महापालिकेमार्फत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू होता.

नगरविकास विभागाकडून मलनिस्सारण प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या आवश्यक कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्याबाबत ६ एप्रिलला शासनाने आदेश निर्गमित केला आहे. त्यानुसार एकूण ४५ कोटी ७१ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

यात केंद्र सरकारचे ५० टक्के अनुदान २२ कोटी ८५ लाख पाच हजार, राज्य शासनाचा २५ टक्के वाटा म्हणजेच ११ कोटी ४२ लाख सात हजार आणि तितकाच २५ टक्के ११ कोटी ४२ लाख आठ हजार महापालिकेचा हिस्सा असेल.

कामे पूर्ण होतील

निधी मंजूर झाल्यामुळे भूमिगत गटार योजनेतील उर्वरित कामे पूर्ण होऊ शकतील. प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी पाठपुरावा केला.

निधी उपलब्धतेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार अमरिशभाई पटेल, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया शेट्टी यांचे सहकार्य लाभले, अशी माहिती महापौर प्रतिभा चौधरी, आयुक्त देवीदास टेकाळे, उपमहापौर नागसेन बोरसे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Certificates: केंद्राकडून CAAची प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; कोणाला मिळालं पहिलं प्रमाणपत्र? जाणून घ्या

Nashik Modi Rally: "मोदीजी आता कांद्यावर बोला" मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?

PM Modi Nashik: नाशिकमध्ये पंतप्रधान अखेर कांद्यावर बोललेच; ऑपेरेशन ग्रीन, निर्यात बंदी आणि बफर स्टॉकबाबत म्हणाले...

Chandu Champion : 'चॅम्पियन आ रहा है'...कार्तिकच्या आगामी सिनेमाचं पोस्टर रिलीज; लूकची होतेय चर्चा

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत मेट्रो बंद; सुरक्षेचे कारण देत घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT