bank
bank 
उत्तर महाराष्ट्र

बॅंकिंग फ्रंटीयरतर्फे महाराष्ट्रातील सहा बॅंकांचा सन्मान 

निखिल सूर्यवंशी

धुळे : आगीच्या घटनेनंतर सावरलेल्या धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला नवी दिल्लीत बेस्ट डाटा सिक्‍युरिटी पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्रातील सहा सहकारी बॅंकांचा सन्मान झाला. येथील जिल्हा बॅंकेत कॉंग्रेस आघाडीची सत्ता आहे.  

दरवर्षी बॅंकिंग फ्रंटीयरतर्फे (एफसीबीए) देशातील बॅंकिंग क्षेत्रात वैशिष्टपूर्ण व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बॅंकांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या पुरस्कारांनी गौरविले जाते. यावेळी नवी दिल्ली येथील हॉटेल प्राइड प्लाझामध्ये "एनएएफएससीओबी'चे अध्यक्ष, "नाबार्ड'चे सरव्यवस्थापक सी. रामचंद्रन, रिझर्व्ह बॅंकेचे माजी गर्व्हनर आर. गांधी, सहकार भारतीचे सतीश मराठे, लखनौस्थित नाबार्डचे (बर्ड) व्यवस्थापक मणिकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे- नंदुरबार जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, सरव्यवस्थापक विजय सावंत, आयटी कक्षप्रमुख संजय काटे यांचा बेस्ट डाटा सिक्‍युरिटी पुरस्काराने गौरव झाला. 

जिल्हा सहकारी बॅंकेला 17 एप्रिल 2016 ला आग लागली. तीत बॅंकेचे संपूर्ण प्रशासकीय कार्यालय, "रेकॉर्ड' आणि संगणकीय साहित्य जळून नष्ट झाले. परंतु, बॅंकेने 2014 पासून सर्व ग्राहक आणि बॅंकेचा डाटा नाशिक येथील "इएसडीएस' कंपनीच्या डिझास्टर रिकव्हरी सेंटरमध्ये भाडेतत्त्वावर सुरक्षित केला होता. त्याप्रमाणे बॅंकेने नियमित डीआर, ड्रिल, डाटा सेंटर तपासणी, टेक्‍निकल बिझनेस ऍण्ड डेटा कन्टीन्यूटी प्लॅन ऍण्ड डीआर सेव्हड्‌ डाटा चेकींगसारख्या तपासणीचे अत्याधुनिक टूल्स वापरल्याने सर्व ग्राहकांचे निरनिराळ्या प्रकारचे व्यवहार आगीच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 18 एप्रिल 2016 ला सकाळी साडेदहाला सुरळीत सुरू झाले.

नवीन डाटा सेंटर उभारणीपर्यंत तीन महिन्याच्या कालावधीपर्यंत बॅंकेने डिझास्टर रिकव्हरी सेंटरमार्फत बॅंकिंग सेवा सुरू ठेवली. या सर्व कामगिरीची दखल राष्ट्रीय स्तरावरील बॅंकिंग फ्रंटियर या अग्रगण्य संस्थेने घेतली आणि धुळे- नंदुरबार जिल्हा बॅंकेला 2017 चा बेस्ट डाटा सिक्‍युरिटी पुरस्कार जाहीर केला. देशातून महाराष्ट्राला एकूण सहा पुरस्कार प्रदान झाले. कार्यक्रमास नाशिकस्थित कंपनीचे तांत्रिक तज्ञ संदेश सोनार, हरीश गोडसे उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT