Shasan Aplya Dari
Shasan Aplya Dari esakal
उत्तर महाराष्ट्र

Shasan Aplya Dari : कृषी विभाग देणार विविध योजनांचा लाभ; अभियानांतर्गत शेतकऱ्यांना उभारी

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून विविध विभागांमार्फत जिल्ह्यातील ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात येणार आहे. (75 thousand beneficiaries of district will be given direct benefits through Shasan Aplya Dari campaign nandurbar news)

त्यासाठी कृषी विभागाने येत्या खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना आपल्या शेतीकरिता आवश्यक बाबींच्या खरेदीसाठी व शेतीकरिता पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी वेळीच अर्थसहाय्यासाठी जिल्ह्यात १५ जून २०२३ पर्यंत विविध योजनांचा लाभ देण्याचे नियोजन केले आहे.

कृषी विभागामार्फत बाह्य सहाय्यित प्रकल्प, विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. केंद्र पुरस्कृत योजनांचे वार्षिक कृती आराखडे अंतिम झाल्यानंतर केंद्र सरकारकडून वर्षभरात टप्प्याटप्प्याने निधी प्राप्त होतो. त्याचप्रमाणे, राज्य पुरस्कृत योजनांसाठीदेखील वित्त विभागाकडून टप्प्याटप्प्याने निधी प्राप्त होतो.

हा निधी टप्प्याटप्याने प्राप्त होत असला तरी कृषी क्षेत्राचे कामकाज हंगामनिहाय चालते. खरीप व रब्बी हंगामात लागवडीखाली येणाऱ्या क्षेत्रापैकी सुमारे ७५ टक्के क्षेत्रावर खरीप हंगामातच विविध पिकांची लागवड होते.

त्यामुळे खरीप हंगाम जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना पूरक ठरणाऱ्या विविध योजनांतर्गत योजनांचे जिल्हानिहाय ठरवून दिलेले उद्दिष्ट साध्य या मोहिमेतून करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अभियान राबविण्यासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांसाठी अर्थसंकल्पीय अंदाज पुस्तकामध्ये मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीच्या किमान ८० टक्के निधी उपलब्ध होईल असे गृहीत धरून उपरोक्त योजनांकरिता लाभार्थी निवडीची प्रक्रिया महाडीबीटी प्रणालीद्वारे तातडीने सुरू करण्यात येऊन अभियानाकरिता जिल्हा व तालुकानिहाय लक्ष्यांक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्या समन्वयाने आयुक्त, कृषी यांच्या मान्यतेने निश्चित करण्यात येईल.

कृषी आयुक्तालयाने ८० टक्के निधीच्या मर्यादेत जिल्हा व तालुकानिहाय अस्थायी स्वरूपात आर्थिक व भौतिक साध्य निश्चित करून द्यावे आणि केंद्र पुरस्कृत योजनांचे वार्षिक कृती आराखडे अंतिम झाल्यानंतर सुधारित जिल्हा व तालुकानिहाय आर्थिक व भौतिक साध्य क्षेत्रीय स्तरावर कळविण्यात येणार आहे.

अभियान यशस्वी करण्यासाठी अर्ज केलेले अर्जदार, योजनेचे नाव, पात्र/अपात्र अर्जदार, अपात्रतेची कारणे इत्यादी तपशील अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

Dinesh Karthik RCB vs CSK : धोनीच्या षटकार ठरला आरसीबीसाठी टर्निंग पॉईंट... दिनेश कार्तिक असं का म्हणाला?

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

SCROLL FOR NEXT