Nandurbar News : रूग्णवाहिकेतच दिला मातेने बाळाला जन्म!

Relatives, staff while shifting the mother and newborn to another ambulance.
Relatives, staff while shifting the mother and newborn to another ambulance. esakal

Nandurbar News : 'देव तारी त्याला कोण मारी' तसेच 'बिव्हिजी ग्रुपचा भोंगळ कारभार' चा प्रत्यय तळोद्यात आला. कडक उन्हात भरदुपारी एका मातेने रुग्णवाहिकेतच बाळाला जन्म दिला, मात्र प्रसूतीनंतर अवघ्या एक किलोमीटर अंतर कापल्यावर रुग्णवाहिका पंचर झाली. (mother gave birth to the baby in ambulance nandurbar news)

रुग्णवाहिकेत स्टेफनी नसल्याने चक्क दुसरी रुग्णवाहिका बोलविण्यात आली. त्यामुळे संबंधित माता, नवजात बालक यांचा जीव भांड्यात पडला होता. अत्यावश्यक सेवा असून देखील रुग्णवाहिकेत स्टेफनी नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शेंदवाने (ता.धडगाव) येथील महिला आज गुरुवारी (ता.१८) धडगाव तालुक्यातील बिलगाव आरोग्य केंद्रावरून रुग्णवाहिकेतून प्रसूतीसाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात कुटुंबियांसह जात होती.

दुपारी दोनच्या सुमारास रुग्णवाहिका हातोडा गावाजवळ आली असताना, महिलेला प्रसव वेदना सुरू झाल्या. सुदैवाने रुग्णवाहिकेतच महिलेची सुखरूप प्रसूती झाली. मात्र प्रसूतीनंतर त्या महिलेला अगदी जवळच असलेल्या तळोद्यातील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल न करता, चालक रुग्णवाहिका नंदुरबारला घेऊन जात होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Relatives, staff while shifting the mother and newborn to another ambulance.
Nashik: उताऱ्यातील कैऱ्यांचा घेतला चवीने आस्वाद! महाराष्ट्र अंनिसकडून अंधश्रद्धा विरोधात असेही प्रबोधन

प्रसूतीनंतर रुग्णवाहिका जेमतेम एक किलोमीटर पुढे गेल्यावर पंचर झाली. अत्यावश्यक सेवा असल्याने रुग्णवाहिकेत दुसरं चाक (स्टेफनी) असणे आवश्यक होते. मात्र पंचर झालेले चाक बदलण्यासाठी रुग्णवाहिकेत स्टेफनीच नव्हती. यामुळे अत्यावश्यक सेवा तिथेच कोलमडली. संबंधित महिलेचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले होते.

यादरम्यान नंदुरबारहुन दुसरी रुग्णवाहिका बोलविण्यात आली. काही वेळानंतर ती आली, त्यानंतर प्रसूती झालेली माता व बाळाला नंदुरबारला हलविण्यात आले. नंदुरबार येथील डॉ. अंजली अग्रवाल यांनी रुग्णवाहिकेत संबंधित मातेवर व नवजात बालकावर उपचार केले. संबंधित माता व नवजात बालकाची प्रकृती व्यवस्थित आहे.

बिव्हिजी ग्रुपचा भोंगळ कारभार

नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णवाहिका या बिव्हिजी (BVG) या खासगी कंपनीच्या असल्याचे समजते. ही कंपनी ही नावाजलेली आहे. जिल्ह्यातील एकंदरीत आरोग्याची परिस्थिती लक्षात घेता, जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिका सुस्थितीत असणे आवश्यक आहे.

Relatives, staff while shifting the mother and newborn to another ambulance.
Teacher Transfer : शिक्षकांच्या अन्यायकारक बदल्यांना 7 जूनपर्यंत स्थगिती

मात्र आज व यापूर्वी देखील रुग्णवाहिकेबाबत अनेक चुकीचे प्रकार केले आहेत. त्यामुळे कंपनीचा भोंगळ व्यवस्थापनाबद्दल सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापनाला कोण पाठिशी घालत आहे, हे देखील उघडकीस यायला हवे अशी प्रतिक्रिया यानिमित्ताने नागरिकांमधून उमटतं आहेत.

अनेक प्रश्न उपस्थित

संबंधित महिलेची ज्याठिकाणी प्रसूती झाली तेथून तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हाकेच्या अंतरावर होते, त्यामुळे तिला प्राथमिक उपचारासाठी तिथे दाखल न करता, तिला नंदुरबारला घेऊन जाण्याचा अट्टाहास का करण्यात आला.

पुढे रुग्णवाहिकेचे टायर पंचर झाल्यावर देखील तळोद्यातील रुग्णालयात दाखल न करता, दुसरी रुग्णवाहिका नंदुरबारहून येण्याची वाट का पहिली, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. यादरम्यान एखादी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोणाला धरले असते असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे.

Relatives, staff while shifting the mother and newborn to another ambulance.
Nashik News: शहरातील 2 पोलीसांच्या आत्महत्या; लागोपाठच्या घटनांमुळे पोलीस कुटुंबीयांमध्ये भीतीचं वातावरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com