dhule municipal corporation  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Municipalty News : सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी 83 कर्मचाऱ्यांचे बळ; बाह्ययंत्रणेद्वारे मनुष्यबळ घेणार

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता महापालिकेने बाह्य यंत्रणेमार्फत हे मनुष्यबळ उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला असून गुरुवारी (ता.९) स्थायी समितीने या विषयाला मंजुरी दिली.

नव्याने कार्यान्वित झालेल्या अक्कलपाडा योजनेसह जुन्या व्यवस्थेवर कामासाठी विविध पदांवरील साधारण ८३ कर्मचाऱ्यांची यातून नियुक्ती होणार आहे. (83 staff strength for smooth water supply dhule news )

या मनुष्य बळासाठी महापालिकेच्या तिजोरीवर वार्षिक सुमारे सव्वा दोन कोटी रुपये खर्चाचा बोजा पडणार आहे. मात्र, यातून शहरवासीयांना नियमित व वेळेवर पाणी मिळेल अशी अपेक्षा आहे.

धुळे शहरातील विविध प्रमुख प्रश्‍नांपैकी नेहमीच अग्रस्थानी राहणारा प्रश्‍न पाणीपुरवठ्याचा आहे. गेली अनेक वर्ष या प्रश्‍नाने धुळेकरांची पाठ सोडलेली नाही. आठ-आठ, दहा-दहा दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे धुळेकर नागरिक हैराण आहेत. या समस्येतून सुटका व्हावी यासाठी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे स्वप्न दाखविले गेले.

अनेक वर्षानंतर हे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. अक्कलपाडा पाणी योजना कार्यान्वित झाली आहे. एकीकडे ही व्यवस्था उभी राहिल्यानंतर मात्र मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर कमतरता निर्माण झाली. त्यामुळे महापालिकेने पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेसाठी आवश्‍यक मनुष्यबळ उपलब्धतेचा निर्णय घेतला.

नवीन अक्कलपाडा योजनेसह जुन्या योजनेवर कामासाठी बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करण्यास गुरुवारी (ता.९) महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. शहरातील सद्यःस्थितीतील २९ पेक्षा अधिक जलकुंभावर शिवाय भविष्यातील वाढती गरज लक्षात घेता व्हॉल्व्हमन, वॉचमन, पंप ऑपरेटर आदी वर्ग-४ चे ५० कर्मचारी बाह्य यंत्रणेमार्फत घेण्यात येणार आहेत.

एक कोटी ११ लाख खर्च

५० कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेसाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. या प्रक्रियेत सवितामाई एस. बी. सेवा सह. संस्था, बडगुजर अँड कंपनी, के. जी. एन. केटर्स अँड ट्रेडर्स, महाजन ब्रदर्स, फ्रेंडस इंजी. कॉर्पोरेशन, यशश्री एन्टरप्रायजेस अशा सहा निविदा प्राप्त झाल्या.

कागदपत्रांच्या पूर्तते अभावी तीन निविदा उघडल्या नाहीत. उर्वरित सवितामाई एस. बी. सेवा सह. संस्था (४० टक्के), के. जी. एन. केटर्स अँड ट्रेडर्स (४५ टक्के) व यशश्री एन्टरप्रायजेस (४८ टक्के) या तीन निविदा उघडण्यात आल्या.

सर्वांत कमी दराच्या सावित्रीमाई एस. बी. सह. संस्थेला वाटाघाटी अंती ३० टक्के जास्त दराने काम देण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार मासिक नऊ लाख २४ हजार ८२० तर वार्षिक एक कोटी दहा लाख ९७ हजार ८४० रुपये खर्च होणार आहे.

अक्कल पाड्यासाठी ३३ कर्मचारी

तसेच अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेवर ३३ कर्मचारी घेण्यासाठीही निविदा मागविण्यात आल्या. पंप ऑपरेटर, हेल्पर, वॉचमन, इलेक्ट्रिकल कर्मचारी, फिल्टर इन्स्पेक्टर, फिल्टर ऑपरेटर, हेल्पर/लेबर/वॉचमन आदी कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.

यासाठी सर्वांत कमी मे. बडगुजर ॲण्ड कंपनी (नाशिक) यांची निविदा प्राप्त झाली. त्यांना काम देण्यास मंजुरी देण्यात आली. दरम्यान, या ३३ कर्मचाऱ्यांवर प्रतिमहा नऊ लाख ५० हजार रुपये तर वर्षभरासाठी सुमारे एक कोटी १४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या विषयालाही स्थायी समितीने मंजुरी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT