Aayushyaman-Scheme
Aayushyaman-Scheme 
उत्तर महाराष्ट्र

‘आयुष्यमान’ योजनेंतर्गत जिल्ह्यात ३१ आरोग्यमित्र!

सकाळवृत्तसेवा

जळगाव - गरीब रूग्णांना चांगली वैद्यकीय सेवा देण्याच्या उद्देशाने ‘आयुष्यमान भारत’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्हा रुग्णालयात सेवा सुरू झाली असून, दुसऱ्या टप्प्यात खासगी हॉस्पिटलचा समावेश होणार आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात ३१ आरोग्यमित्र नेमण्यात आले आहेत. 

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अर्थात ‘आयुष्यमान भारत’ ही योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसोबतच राबविण्यात येत आहे. आयुष्यमान भारत योजनेसाठी (पीएमजेएवाय) २०११ मध्ये झालेले सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण (एसईसीसी) ग्राह्य धरण्यात आले आहे. त्याची यादी तयार करण्यात आली असून, जळगाव जिल्ह्यात सुमारे ४ लाख ६९ हजार ८६४ कुटुंबे; तर शहरात सुमारे १ लाख ५ हजार ५६ कुटुंबे या योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेसोबत ही योजना राबविण्यात येत असल्याने सध्या या योजनेशी अंगीकृत असलेल्या हॉस्पिटलमध्ये नाही तर केवळ शासकीय रुग्णालयात योजना राबविण्यात येत आहे.

योजनेत ॲपेंडीस, हार्निया शस्त्रक्रियाचाही समावेश 
या योजनेंतर्गत १४२० आजारांवरील उपचार निश्‍चित केले आहे. हे उपचार जीवनदायी योजनेतील आजारांना धरून समाविष्ट आहेत. यात प्रामुख्याने कॅन्सर, हृदयरोग, मूत्रपिंड, यकृत, मधुमेहासह महात्मा फुले योजनेत नसलेल्या काही रक्‍त तपासण्या, ॲपेंडीस, हार्निया, डोळे-दात शस्त्रक्रिया, सीटी स्कॅन, एमआरआय या तपासण्यांचा देखील समावेश आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे होणार नवी नोंदणी
सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार लाभार्थ्यांची नोंदणी यापूर्वीच करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यात ४ लाख ६९ हजार ८६४ कुटुंबांचा समावेश आहे. पण या व्यतिरिक्‍त काही लाभार्थी नोंदणी करावयाची असल्यास तालुकास्तरावरील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करता येणार आहे. ही नोदणी लवकरच सुरू होईल.

या लाभार्थ्यांचा समावेश
ग्रामीण भागासाठी एका खोलीत कच्च्या घरात राहणारी व्यक्‍ती, प्रौढ नसलेली व्यक्‍ती, स्त्री कुटुंब प्रमुख असलेले कुटुंब, दिव्यांग कुटुंब प्रमुख, भूमिहीन मजुरांचे कुटुंबासह अनुसूचित जाती व जमाती. तसेच भिक्षुक, स्वच्छता कर्मी, कंत्राटी कर्मचारी, कचरा वेचणारे कुटुंबाचा समावेश आहे. तर शहरी भागासाठी लाभार्थी निवडताना व्यावसायिक निकष ठरविण्यात आले असून, यात कचरा वेचक, घरकाम करणारे, भिक्षुक, गटई कामगार, फेरीवाले, बांधकाम कामगार, प्लंबर, गवंडी, रंगकाम करणारे, वेल्डर, सफाई कर्मचारी, माळीकाम करणारे, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतूक कर्मचारी, चालक- वाहक, मदतनीस, वीजतंत्री आदी लाभार्थी आहेत.

आयुष्यमान भारत योजनेंतर्गत सध्या जिल्हा रुग्णालयात ही सेवा सुरू असून, जीवनदायी योजनेंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील सतरा रुग्णालयात ही सुविधा असेल. यामध्ये आणखी काही हॉस्पिटलचा समावेश करण्यात येणार असून, लाभार्थी नोंदणी तालुकास्तरावर करता येईल.’
- डॉ. नागुराव चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, जळगाव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: केएल राहुलने जिंकला टॉस, लखनौ संघात मोठा बदल; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT