Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Abhay Yojana : थकबाकीदारांची नावे चौकाचौकांत लावू...महापालिका प्रशासनाचा इशारा!

सकाळ वृत्तसेवा

धुळे : मालमत्ता कर, पाणीपट्टीपोटी एक लाखावर थकबाकी असलेल्या थकबाकीदारांनी थकबाकी अदा न केल्यास संबंधितांची नावे वर्तमानपत्रात तसेच चौकाचौकांत होर्डिंगवर प्रसिद्ध करू, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. (abhay yojana municipal administration has warned If arrears do not pay dues there name will be published on hoardings dhule news)

शहरातील मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कर, पाणीपट्टी थकीत असल्याने महापालिकेकडून मोहीम सुरू आहे. काही थकबाकीदारांवर कारवाईदेखील करण्यात येत आहे. दरम्यान, थकबाकीदारांना मालमत्ता करावरील शास्ती (दंड) शंभर टक्के माफ करूनदेखील काही थकबाकीदार पुढे येत नसल्याचे चित्र आहे.

महापालिकेने ६ फेब्रुवारीपासून शंभर टक्के शास्तीमाफी योजना लागू केली आहे. या योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेसही आता थोडे दिवस शिल्लक आहेत. तरीही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आता महापालिका प्रशासनाने विविध स्वरूपाच्या कारवाईचा बडगा उगारल्याचे दिसत आहे. यात आता थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात तसेच होर्डिंगद्वारे चौकाचौकांत प्रसिद्ध करण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

चौदा हजारांवर थकबाकीदार

धुळे शहरात एकूण १४ हजार ८३८ मालमत्ताधारकांकडे मालमत्ताकर व पाणीपट्टी थकीत आहे. थकबाकीदारांनी आपला मालमत्ता कर व पाणीपट्टी रक्‍कम शास्तीमाफीच्या अंतिम तारखेच्या आत भरावयाची आहे. संबंधितांनी संपूर्ण थकबाकी रक्कम अदा करणे आवश्‍यक आहे.

एक लाखावर थकबाकी असलेल्या थकबाकीदारांनी आपल्याकडील थकबाकी अदा न केल्यास संबंधितांची नावे वर्तमानपत्रात तसेच चौकाचौकांत होर्डिंगद्वारे यादी प्रसिद्ध करण्यात येईल याची नोंद घ्यावी. त्यामुळे असा कटू प्रसंग टाळण्यासाठी कराचा भरणा करावा, मनपास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार म्हणजे 'देशी ब्रिटिश', असिम सरोदेंच्या निलंबनावरून ठाकरे गट आक्रमक....

Kartik Purnima 2025: दिवे दान केल्याने माता लक्ष्मी अन् भगवान विष्णू कसे प्रसन्न होतात? जाणून घेऊया सविस्तरपणे

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा ऑलिंपिक मार्ग खडतर; ४९ किलो वजनी गटाला कात्री, आता ५३ किलोत खेळावे लागणार

Raju Shetti Protest : कोल्हापुरात राजू शेट्टी समर्थक आणि पोलिसांत झटापट; राजेंद्र गड्ड्यान्नावर यांच्यावर पोलिसांचा बळाचा वापर

Ahilyanagar fraud: नफ्याच्‍या आमिषाने तीन कोटींची फसवणूक; शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नडली, अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ

SCROLL FOR NEXT