After the written assurance of market committee the farmers hunger strike is over
After the written assurance of market committee the farmers hunger strike is over 
उत्तर महाराष्ट्र

बाजार समितीच्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे उपोषण मागे 

सकाळवृत्तसेवा

येवला - अंदरसूल येथील कांदा व्यापाऱ्यांनी बाजार समिती मध्ये विकलेल्या कांद्याचे पैसे तीन न दिल्याने येथील सहायक निबंधक कार्यालयासमोर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आमरण उपोषण आज शनिवारी दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले. 30 एप्रिल पर्यत सर्व शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्याचे लेखी आश्वासन बाजार समितीच्या वतीने देण्यात आल्यावर शेतकऱ्यांनी सायंकाळी लिंबूपाणी घेऊन उपोषण सोडले. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्याने यावर तोडगा निघाला.

अंदरसूल उपबाजार आवारात शेतकर्यांनी डिसेंबर,जानेवारीत विक्री केलेल्या कांद्याचे पैसे राजेंद्र धुमाळ व दत्तात्रय पैठणकर यांनी 45 वर शेतकऱ्यांचे 50 लाख रुपये थकवले आहेत.या शेतकऱ्यांना दिलेले धनादेश वठले नाही तर नंतर पैशांची मागणी केल्यावर हे व्यापारी उडवाउडवीचे उत्तरे देत होते.त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला होता.काल शुक्रवारी कोणीही उपोषणस्थळी न फिरकल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याची भूमिका घेतली होती.

अंदरसूल, नगरसूल, तळवाडे, पांजरवाडी, धामणगाव, पाराळा, गारखेड, देशमाने, उंदीरवाडी, ममदापूर, गवंडगाव, बोकटे, देवठाण, कोळम, पढेगाव, निमगाव मढ, दुगलगाव, अंगुलगाव आदी गावांमधील पैसे थकलेले आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सहभागी झाले होते.

शेतकरी पैसे मिळेपर्यंत उपोषण मागे न घेण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने व वरिष्ठ पातळीवर याची गंभीर दखल झाल्याने वेगाने चक्र फिरून आज तोडगा काढण्यात आला. प्रांताधिकारी भीमराज दराडे,बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे, सचिव डी. सी. खैरणार, भाजपा नेते बाबा डमाळे, सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील, जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे आदींनी शेतकऱ्यांशी यशस्वी चर्चा केली. जिल्हा निबंधक निळकंठ करे या घटनाक्रमात संपर्कात होते. 30 एप्रिलपर्यंत संबंधित व्यापाऱ्यांकडून शेतकरी येणे वसूल करुन शेतकऱ्यांना त्यांचे पेमेंट देण्याचा प्रयत्न बाजार समिती करणार आहे. तसे न झाल्यास उपोषणकर्ते शेतकरी यांच्या मागणी नुसार पणन विभागाकडे कृउबा समितीच्या वतीने बाजार समितीच्या सेस मधून शेतकऱ्यांना पेमेंट अदा करण्यासंदर्भात परवानगी देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे याप्रसंगी ठरले.

बाजार समितीसह सहायक निबंधकानी दिलेल्या लेखी आश्वासनावर सामंजस्याची भूमिका घेत बाजार समितीला 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेऊन उपोषण थांबवण्यात आले. प्रांताधिकारी दराडे, पाटील आदीच्या हस्ते लिंबूपाणी देऊन उपोषण सोडण्यात आले. याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती गणपतराव कांदळकर, संचालक संतू झांबरे, कृष्णराव गुंड, भास्कर कोंढरे, नवनाथ काळे, देविदास शेळके, अशोक मेंगाणे, गोरख सुराशे, दिपक जगताप, खरेदी विक्री संघ अध्यक्ष भागुनाथ उशीर, शरद लहरे, सुभाष निकम, विजय खैरणार,सत्येन गुंजाळ, निर्मला जगझाप, सचिव डि. सी. खैरणार आदी उपस्थित होते. दरम्यान, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश चव्हाण,तालुका अध्यक्ष हरिभाऊ महाजन, उपाध्यक्ष वसंत झाम्बरे, भाऊसाहेब गाडे, किरण कदम, अमोल फरताळे, योगेश चव्हाणके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रावण देवरे, जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर बाजू लावून धरली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT