Laxman Ganaveer embarked on the Sadbhavana Padayatra on the occasion of the nectar jubilee year of independence. esakal
उत्तर महाराष्ट्र

गणवीर करताय अमृत महोत्सवी सद्भावना पदयात्रा; राज्यभर भ्रमंती

सकाळ वृत्तसेवा

कापडणे (जि. धुळे) : कमरेला ढोल बांधलेले. हाताला आणि कंबरेला घुंगरू माळ बांधलेली. डोक्यात सुवर्ण महोत्सवी प्रतीक असलेली टोपी. थोर नेत्यांचे फोटो असलेले बॅनर. तिरंगा ध्वज लावलेले अन्‌ चाळीस किलोचे वजन तोलीत, ते पदयात्रेला निघालेले आहेत.

ढोल वाजवीत घुंगरांचा छुनछुन आवाज आणि पिपाणीवर देशभक्तीची गीते वाजवित साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत. इंदूरचे लक्ष्मण गणवीर युवकांमध्ये देशभक्ती जागविण्यासाठी भ्रमंतीसाठी बाहेर पडले आहेत. (Amrit Mahotsav Sadbhavana Padayatra by Ganveer Tour across state dhule Latest Marathi News)

लक्ष्मण गणवीर यांच्याजवळ वयाच्या सत्तरीतही दुर्दम्य इच्छा शक्ती आहे. देशातील वातावरण बघून व्यथित होत आहेत. सध्या राष्ट्रभक्ती कमी आणि राजकीय भक्ती अधिक वाढलेली आहे. युवकांमध्ये राष्ट्रभक्ती जागविण्यासाठी बाहेर पडलो आहे. मध्य प्रदेशमध्ये सद्भावना यात्रा पूर्ण झाली आहे. आता महाराष्ट्रभर फिरायचे आहे, असे गणवीर यांनी सांगितले.

गणवीर यांच्याजवळ पपैया, ढोलक आणि घुंगरू साखळी आहे. इको माईक आणि स्पीकर सिस्टम आहे. पपैयावर सुमधुर गीते वाजवतात. देशभक्तिपर गीते आणि त्यांच्या जोडीला शेरोशायरी यामुळे ते देशभक्तीची प्रेरणा देण्यात यशस्वी ठरत आहेत.

त्यांची मुले नोकरीला आहेत. त्यांना मात्र देशभक्ती जागविण्यासाठी काढलेली पदयात्रा निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. गणवीर सध्या धुळे शहरात ठिकठिकाणी फिरत आहेत. दोन दिवसांनंतर शिर्डीकडे प्रस्थान करणार आहेत. आतापर्यंत त्यांचा दोन हजार किमीचा पायी प्रवास झालेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात! गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा कायम, आज अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता

VIDEO : 'पप्पा, माझा एक बॉयफ्रेंड आहे, 11 वर्षांपासून मी त्याच्यावर..'; वडील-मुलीच्या हृदयस्पर्शी संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

Ketu Gochar 2026: जानेवारीत केतुची कृपा! ‘या’ राशीच्या लोकांसाठी सुरू होणार सुवर्णकाळ

Messi in Vantara: मेस्सीची माधुरी हत्तीणीसोबत भेट? पिल्लांसोबत खेळला फुटबॉल... वनतारा’ मध्ये काय घडलं?

प्रसिद्ध युट्यूबरचा 1.20 मिनिटाचा MMS लीक? व्हायरल व्हिडिओची पोलखल: सत्य समोर

SCROLL FOR NEXT