anand londhe esakal
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange Patil Dhule : मनोज जरांगे-पाटील यांनी 24 डिसेंबरवर अडून बसू नये , आजाद समाज पक्षाचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Manoj Jarange Patil Dhule : राज्यात २४ डिसेंबरला भीमा कोरेगाव शौर्य दिन पाळला जातो. या दिवशी मराठा आरक्षणाचा लढा उभारणारे मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला निर्णयासाठी अंतिम मुदत दिली आहे. शौर्य दिन पाहता श्री. जरांगे-पाटील यांनी २४ डिसेंबरवर अडून बसू नये, अशी अपेक्षा आजाद समाज पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद लोंढे यांनी पत्रकद्वारे व्यक्त केली.(Anand Londhe statement of Manoj Jarange Patil should not stop at December 24 dhule news)

श्री. लोंढे यांच्या पत्रकाचा आशय असा ः राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्‍न चर्चेचा बनला आहे. श्री. जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथून सुरू केलेल्या मागणीला सकल मराठा समाजाने जनआंदोलनाचे स्वरूप दिले आहे. श्री. जरांगे-पाटील यांनी सरकार वायदे व तारखाच देत असल्याने राज्यभर दौरे सुरू केले आहेत.

त्यात मराठा आरक्षणाचा विषय धुमसत ठेवत श्री. जरांगे-पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबर ही निर्णयासाठी अंतिम मुदत दिली आहे. तथापि, राज्य सरकार २ जानेवारीपर्यंत मुदत मागत होते. श्री. जरांगे-पाटील २४ डिसेंबर या तारखेवर अडून बसले आहेत.

मराठा आरक्षणास पाठिंबा

मराठा आरक्षण आंदोलनास आजाद समाज पक्षाचा पाठिंबा आहे. तसेच कोणत्याही प्रवर्गाच्या आरक्षण मागणीला विरोध नाही. परंतु, जरांगे-पाटील यांनी २४ डिसेंबरला राज्यात भीमा कोरेगाव शौर्य दिन पाळला जात असल्याने या तारखेबाबत भूमिका लवचिक करावी, अशी मागणी आहे. १ जानेवारी २०१८ ला भीमा कोरेगावच्या लढाईचा दोनशेवा शौर्य दिन साजरा करण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायी जमले होते.

त्या वेळी एक अनुचित घटना घडली. त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले. तेव्हापासून ३१ डिसेंबरला भीमा कोरेगावला अभिवादनासाठी जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या संख्येत लाखोंनी वाढ होत आहे. त्यामुळे सर्वच मार्ग गर्दीमय होतात. त्यासाठी २४ डिसेंबरपासून अनुयायांचा भीमा कोरेगावकडे प्रवास सुरू होतो. या कालावधीत श्री. जरांगे-पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलन मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. त्यासाठी गर्दी असेल.

त्यामुळे आंबेडकरी अनुयायी व मराठा समाजाच्या आंदोलकांची होणारी गर्दी लक्षात घेता, त्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी, प्रसंगी अपप्रवृत्तींचे कथित मनसुबे उधळून लावण्यासाठी श्री. जरांगे-पाटील यांनी २४ डिसेंबरची मुदत ५ जानेवारीपर्यंत पुढे नेली, तर राज्य सरकारलाही शांततेकामी सहकार्य मिळू शकेल. त्यामुळे त्यांनी धुळे शहरात ३ डिसेंबरला होणाऱ्या सभेत या मागणीवर भूमिका विशद करावी, असे पत्रकात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT