Anarya Sonawane s innovation praised by Niti Ayog
Anarya Sonawane s innovation praised by Niti Ayog 
उत्तर महाराष्ट्र

शिरपूरच्या अनार्यची यशोगाथा नीति आयोगाच्या वेबपेजवर

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (जि. धुळे) : येथील आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी वैज्ञानिक अनार्य शैलेंद्र सोनवणे याची इनोव्हेशन स्टोरी निती आयोगाच्या वॉल ऑफ फेम या वेबपेजवर झळकली आहे. आठवीच्या वर्गात असतांना इंटरनेट अँड थिंग्स व रोबोटिक्स या विषयावर त्याने लिहिलेल्या ऑर्डीनो गाईड फॉर बिगीनर्स या पुस्तकाची दखल घेऊन निती आयोगाने त्याला हा बहुमान दिला आहे.

सध्या नववीच्या वर्गात असलेला अनार्य सोनवणे विद्यालयाच्या अटल लॅबमध्ये सक्रिय असतो. यू ट्यूबच्या माध्यमातून संशोधन सादर करीत असतो. त्याच्या व्हिडिओ क्लिप्सचे ऑस्ट्रेलियात कार्यरत रोबोटिक्स इंजिनिअर आशिष धर्माधिकारी यांनी विशेष कौतुक केले आहे. निती आयोगाच्या सदस्या श्रीमती खयाती यांनी त्याच्या ऑर्डीनो गाईड फॉर बिगीनर्स  या पुस्तकाची फेसबुकच्या माध्यमातून दखल घेतली. या पुस्तकाची प्रत व अन्य माहिती मागवली. त्याच्या संशोधन कार्याची खात्री केल्यानंतर देशातील संशोधन क्षेत्रात कार्यरत निवडक विद्यार्थ्यांचा प्रवास प्रकाशित केल्या जाणाऱ्या वॉल ऑफ फेम या वेबपेजवर अनार्यची संशोधन गाथा प्रकाशित करण्यात आली.

अनार्यच्या यशाचे टेक बी (भिलाई), रोबोकार्ड (मुंबई), रोबोटेक (नवी दिल्ली), आविष्कार (इंदोर) या उद्योगातील अधिकाऱ्यांनी कौतुक केले. त्याला अटल लॅबचे संचालक एन.ई.चौधरी, वडील शैलेंद्र सोनवणे, आई प्रीती गुरव यांचे उत्तेजन लाभले. ऑर्डीनोचा वापर करीत अनार्यने अनेक मॉडेल्स तयार केले असून त्यांचे पेटंट मिळवण्यासाठी शिरपूर एज्युकेशन सोसायटी प्रयत्न करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT