उत्तर महाराष्ट्र

बनावट कागदपत्रांद्वारे कंपनी बळकावण्याचा प्रयत्न 

सकाळवृत्तसेवा

नाशिक - पुणेस्थित मालकाच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीची संशयितांनी संगनमताने बनावट कागदपत्रे बनवून कंपनीत अनधिकृतरीत्या प्रवेश केला. कंपनीची पाच कोटी 70 लाखांच्या मशिनरीची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संशयित राजू शंकर पवार, ज्ञानोबा जाधव, ए. जी. बांधेकर, प्रकाश बांधेकर व माधवी बांधेकर यांच्याविरोधात अंबड पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

दिनेश सुभाष चंद्रा (रा. वसुंधरा, महंमदवाडी, पुणे) यांच्या फिर्यादीनुसार अंबड औद्योगिक वसाहतीत त्यांची "डीन इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन' या नावाची कंपनी आहे. गेल्या 17 मे 2016 पासून संशयितांनी संगनमत करून दिनेश चंद्रा यांचा विश्‍वास संपादन केला. त्याच विश्‍वासाच्या आधारे संशयितांनी कंपनीच्या नावाची बनावट कागदपत्रे तयार केली. कंपनीच्या नावाचे आणि मालक चंद्रा यांच्या सहीचे शिक्केही तयार केले. कागदपत्रे बनावट असताना ती खरी असल्याचा बनाव रचत वापर केला. संशयित ए. जी. बांधेकर, प्रकाश व माधवी बांधेकर यांनी या बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनीतील पाच कोटी 70 लाखांची मशिनरीची परस्पर विक्री करून कंपनीचे मालक दिनेश चंद्रा यांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर चंद्रा यांनी पोलिसांकडे धाव घेतली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

Changpeng Zhao: बिनन्सच्या संस्थापकाला तुरुंगवास; जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंजमध्ये नेमकं काय झालं?

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Latest Marathi News Live Update: छत्तीसगडमध्ये अँटी-नक्षल ऑपरेशन सुरू; १० नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात

SCROLL FOR NEXT