cottone no worker farmer
cottone no worker farmer 
उत्तर महाराष्ट्र

अस्मानी संकटानंतर मजुरांचे संकट 

सकाळ वृत्तसेवा

पाळधी (ता. जामनेर) : परतीच्या पावसाने केलेला पिच्छा आणि पाण्यात उभ्या असलेल्या कपाशी, मका, ज्वारीचे नुकसान होत आहे. त्यामुळे मिळेल त्या गावातून जास्तीचे पैसे देऊन मजुरांची आयात करून कपाशीची वेचणी करावी लागत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. 

कापूस वेचणीसोबतच खराब झालेली मका, सोयाबीन, ज्वारी काढण्याची एकच लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे मजुरांना अच्छे दिन आले आहेत. तर एकाच वेळेस पीक काढणीची धांदल झाल्याने मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत. परतीच्या पावसाने कापसाची केलेली दाणादाण आणि कापुस वेचणीसाठी असणारा मजुरांचा तुटवडा पाहता, पाळधी (ता. जामनेर) येथील काही शेतकऱ्यांनी तालुक्याबाहेरील मजूर आणणे सुरू केले आहे. तसेच ओला असलेला कापूस पाच ते सहा रुपये किलोने वेचावा लागत आहे. शेजारील गावासह वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरून हिंगणे बुद्रूक, कुंसुबा, उमाळा, कुऱ्हा पानाचे, मांडवा, तांडे इतर बाहेर गावाहून मजुरांची पळवापळवी सुरू आहे. त्यांना ने-आण करण्याचा खर्च प्रत्येकी शंभर रुपयांप्रमाणे वेगळे भाडे शेतकऱ्यांना मोजावे लागत आहे. सर्वच कामासाठी मजुरी वाढल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. 

कपाशी वेचणीची लगबग 
परतीच्या पावसाने थोडीफार उघडीप दिल्याने शेतातील फुटलेल्या कपाशीच्या वेचणीची लगबग सुरू झाली आहे. तसेच सहाशे ते सातशे रुपये क्विंटल दर वेचणीसाठी मजुरांना द्यावा लागत आहे. त्यांच्या अपेक्षेपेक्षा वेचणीचा भाव देऊनही मजूर तात्कळत ठेवत आहेत. ऐन वेळेवर जास्त भाव देणाऱ्याकडे मजूर वळत आहे. यामुळे शेतकरी पार कोंडीत सापडला असून, अस्मानी संकटानंतर मजुरांचेही संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Satara Lok Sabha : साताऱ्याचा खासदार कोण होणार? उमेदवारांचे भवितव्य होणार आज यंत्रात बंद

Met Gala 2024 : बावनकशी सौंदर्य ; मेट गालाला आलियाच्या लूकने वेधलं लक्ष... 'हे' आहे तिच्या खास साडीच वैशिष्ट्य

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी आज बीड दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT