Farmers showing wildly grown bananas. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Agriculture News : रासायनिक फवारणीमुळे केळीच्या बागेला फटका

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Agriculture News : आमोदा (ता. शहादा) शिवारात ११ एकर केळीच्या बागेवर शेतकऱ्याने मुंबई येथील विदेशी कंपनीचे उत्पादक असलेली रासायनिक फवारणी केल्यानंतर ३६ तासांनंतर केळीचा आकार एक फुटापर्यंत वाढून केळीबागांचे फवारणीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

यात सुमारे ७५ लाख रुपयांचा आर्थिक फटका शेतकऱ्याला बसला आहे.(Banana plantation destroyed by chemical spraying in nandurbar agriculture news)

या संदर्भात संबंधित शेतकऱ्याने विदेशी कंपनी तसेच तालुका कृषी अधिकारी, शहादा, जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे तक्रारी दाखल केली आहे. मात्र संबंधित विभागांनी दुर्लक्ष केल्याचे शेतकऱ्याने म्हटले आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यातच अवकाळी पाऊसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा वेळोवेळी सामना करावा लागत आहे.

त्यातच रासायनिक खते, फवारणी विक्री करणाऱ्या कंपनीकडून शेतकऱ्यांची अशी फसवणूक होत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक कचाट्यात सापडला आहे. शहादा तालुक्यातील म्हसावद येथील रहिवासी महेंद्र पाटील यांची आमोदा शिवारात शेती असून, त्यांनी साडेअकरा एकरवर केळीची लागवड केली आहे.

१३ हजार ७०० केळीची झाडे असून, केळीची वाढ व्हावी यासाठी त्यांनी मुंबई येथील एका कंपनीचे रासायनिक फवारणीचे उत्पादन शहादा येथून विकत घेतले व त्यांच्या सांगितल्याप्रमाणे त्यांनी २४ नोव्हेंबर २०२३ ला केळी फळपिकावर फवारणी केली. फवारणीच्या ३६ तासांनंतर केळी बांगडीप्रमाणे गोल-वाकडी व लांब झाली.

अचानक वाढ झालेली केळीची ही वाढ तब्बल एक फुटापर्यंत गेल्याने संबंधित शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. ही बाब श्री. पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित संबंधित रासायनिक फवारणी कंपनीकडे तक्रार दाखल केली. संबंधित कंपनीने फवारणीचे नमुने घेतले असून, ते तपासणीसाठी प्रयोगशाळाकडे पाठविले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT