Shiv-Pratap-Shukla
Shiv-Pratap-Shukla 
उत्तर महाराष्ट्र

...तर बॅंकांचे अस्तित्वच धोक्‍यात आले असते - शिवप्रताप शुक्‍ला

सकाळवृत्तसेवा

नाशिक - मुद्रा योजनेचा एनपीए अवघा तीन टक्‍के असताना, बॅंकांचा कर्ज योजनेतील एनपीए लाखो कोटींच्या घरात आहे. सरकारला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी दोन लाख ११ हजार कोटी रुपयांचे सहाय्य बॅंकांना करावे लागले. ही मदत केली नसती, तर आम्हाला राजीनामा द्यावा लागला असताच; पण बॅंकांचे अस्तित्वदेखील धोक्‍यात आले असते, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्‍ला यांनी शनिवारी (ता. २६) केले. 

बॅंक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स ऑर्गनायझेशनच्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या औपचारिक उद्‌घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे, खासदार हेमंत गोडसे, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लक्ष्माजी रेड्डी, ‘बोमो’चे संस्थापक बाळासाहेब फडणवीस, डॉ. सुधाकर कुलकर्णी, डॉ. सुनील देशपांडे, विराज टिकेकर, दीपक भालेराव उपस्थित होते.

शुक्‍ला म्हणाले, की नागरिकांचा बॅंकिंग व्यवस्थेवरील विश्‍वास उडत चालला आहे. बॅंकिंग व्यवस्थेत प्रामाणिकपणा राहिल्यास ग्राहक जोडला जाईल. आपण संघ परिवारातील असल्याचे सांगत शुक्‍ल यांनी मजदूर संघ हा मजदुरांचा सर्वांत मोठा संघ असल्याचे नमूद केले. मजदूर संघाचे कार्य अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. 

अन्य संघटना स्वतःचे हित पाहता व जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष करतात म्हणून बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडून नीरव मोदी सारख्यांना कर्जवाटप केले जाते व त्यामुळे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर येतात, असा आरोप करताना मजदूर संघाच्या विस्तारवाढीसाठी प्रयत्न केल्यास गैरप्रकारांना आळा बसेल, असा दावा त्यांनी या वेळी केला.

दशा खराब, पण दिशा सुधारलेली - मराठे
बॅंकिंग व्यवस्था अवघड स्थितीतून वाटचाल करीत असून, १८ सार्वजनिक बॅंकांनी सुमारे ७० हजार कोटींचा तोटा झाल्याचे जाहीर केले. राष्ट्रीयस्तरावर इतर बॅंकांच्या तुलनेत महाराष्ट्र बॅंकेची स्थिती अत्यंत चांगली असून, रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकाऱ्यांनीही याबद्दल कौतुक केले. बॅंकेची दशा खराब असली तरी दिशा सुधारलेली आहे. या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी निष्ठेने काम करत परिस्थितीत सुधार करूया, असे आवाहन बॅंकेचे एमडी व सीईओ रवींद्र मराठे यांनी केले. बॅंकेच्या १८ क्षेत्रीय कार्यालयांपैकी तीन बंद केले असून, आगामी काळात आणखी काही कार्यालये बंद करणार आहोत. मनुष्यबळाचा योग्य वापर करताना तंत्रज्ञानाचाही प्रभावीपणे वापर करण्याचा प्रयत्न असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT