Devendra Patil, former president of Zilla Parishad, while laying the groundwork for the construction of primary health center building.
Devendra Patil, former president of Zilla Parishad, while laying the groundwork for the construction of primary health center building. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : पनाखेडला 95 लाखांच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : पनाखेड भागातील नागरिकांना सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी व गावाच्या विकासासाठी जी काही कामे असतील व्यक्तिगत असो किंवा सार्वजनिक कामे आपण सगळे मिळून गावाचा विकास करू.

गरिबांसाठी जी व्यक्तिगत कल्याणकारी योजना आहे ती आपण त्यांच्यापर्यंत पोचवू, पनाखेड गावाच्या विकासकामासाठी दोन लाख रुपये मंजूर केले आहेत. (Bhoomipujan of building construction worth 95 lakhs to Panakhed dhule news)

गावाचा विकास करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार काशीराम पावरा यांनी केले. पनाखेड (ता. शिरपूर) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या ९५ लाख रुपयांच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

काही वर्षांपासून या भागातील नागरिकांची आरोग्य उपकेंद्र नवीन इमारत उभारणीची मागणी होती. ती यानिमित्त पूर्ण होत आहे.

या वेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद आध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती कैलास पावरा, जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल, माजी समाजकल्याण सभापती वसंत पावरा, पंचायत समिती सदस्या प्रभाबाई कोकणी, पंचायत समिती सदस्य बालकिसन पावरा, सामाजिक कार्यक्रर्ता जयवंत पाडवी यांची उपस्थिती होती.

पनाखेड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत जीर्ण झाली होती. याच इमारतीत रुग्णांवर औषधोपचार केले जात होते. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत खैरखुटी, जामन्यापाडा, कुंजीपाडा, शेकड्यापाडा, दोंदवाडीपाडाचा समावेश आहे. या आरोग्य केंद्राच्या इमारत व छताची अवस्था फारच नाजूक होती. ठिकठिकाणी पाण्याची गळती सतत सुरू होती.

त्यामुळे केव्हाही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा आरोग्य विभागाने नवीन इमारत बांधकामाला तत्काळ मजुरी द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती.

त्या मागणीची दखल घेत येथील जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल यांनी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, भूपेशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा यांच्याकडे पाठपुरावा केला.

नवीन मुख्य इमारत, निवासस्थान, आवारभिंत बांधकामासाठी जिल्हा परिषदेकडून ९५ लाख रुपयांचा निधी माजी मंत्री अमरिशभाई पटेल.

भूपेशभाई पटेल, यांच्या प्रयत्नाने मंजूर झाल्याने इमारत बांधकामाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यश देवेंद्र पाटील यांच्यासह या भागातील नागरिक, कार्यकर्ते, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत झाले.

या वेळी गावातील सरपंच करवटीबाई पावरा, उपसरपंच वनसिंग पावरा, पोलिसपाटील दिनेश पावरा, माजी पोलिसपाटील शिवदास भिल.

सामाजिक कार्यकर्ता खुमसिंग पावरा, मेरसिंग पावरा, सखाराम भिल, समुदाय आरोग्य अधिकारी निखिल दिवे, आरोग्यसेविका एम. एम. आखडमल, आरोग्यसेवक राजेंद्र सुरळकर यांची उपस्थिती होती. भिका चारण यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT