Nandurbar News : जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून आदिवासींच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष : राजेश पाडवी

मोरवड (रंजनपूर, ता. तळोदा) येथे तीर्थक्षेत्र विकासासाठी आमदार पाडवी यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या चार कोटी ४० लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
MLA Rajesh Padvi and followers present at the Bhoomi Puja of various development works.
MLA Rajesh Padvi and followers present at the Bhoomi Puja of various development works.esakal

बोरद : अनेक वर्षांपासून प्रलंबित जिल्ह्यातील अनेक प्रश्‍नांकडे लक्ष दिले नाही. लोकप्रतिनिधींनी आदिवासींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. विधानसभेच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचनेवर मी प्रश्न मांडला. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पर्यटन विकास विभागाकडून चार कोटी ४० लाख मंजूर करून आणले.

त्यातून या विकासकामांना चालना मिळाली आहे, असे प्रतिपादन आमदार राजेश पाडवी यांनी केले. (Rajesh Padvi statement Ignorance of problems of tribals by peoples representatives in district nandurbar news)

मोरवड (रंजनपूर, ता. तळोदा) येथे तीर्थक्षेत्र विकासासाठी आमदार पाडवी यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या चार कोटी ४० लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्या वेळी आमदार पाडवी बोलत होते.

या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाडवी यांच्यासह शेकडो अनुयायी उपस्थित होते. १९३७ पासून संत गुलाम महाराज, संत रामनाथ महाराज, संत दगूमाता यांनी आदिवासी समाजातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाऊन व्यसनमुक्तीचे धडे देऊन लोकांना व्यसनापासून लांब ठेवण्यासाठी समाजप्रबोधनाचे मोठे कार्य केले आहे.

ब्रिटिश काळातदेखील आपल्या समाजाला एकत्र ठेवून दारू, मांस, मटण, वाईट सवयींपासून व व्यसनांपासून लांब ठेवून समाजाला देशसेवेत योगदान देण्यासाठी प्रवृत्त केले. यामुळे यांचा ब्रिटिशकालीन इतिहास महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने अभ्यासक्रमात घेण्याची मागणी आमदार राजेश पाडवी यांनी विधानसभेच्या लक्षवेधीमध्ये मांडली होती.

तीच मागणी उद्‍घाटनाच्या वेळी त्यांनी बोलून दाखविली. संत चंद्रसेन महाराज अध्यक्षस्थानी होते. आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नाने रंजनपूर येथे सुसज्ज प्रवेशद्वार, भक्तनिवास, सभामंडप, पुरुष व महिलांसाठी सुसज्ज शौचालय व स्नानगृह आदींसाठी चार कोटी ४० लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर करून आणला आहे.

MLA Rajesh Padvi and followers present at the Bhoomi Puja of various development works.
Nashik ZP News : जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी; जि. प. ग्रामपंचायत विभागाचे आदेश

रंजनपूरच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले. आमदार राजेश पाडवी यांनी या परिसराचा विकास व्हावा व येथील इतिहास शालेय अभ्यासक्रमात यावा यासाठी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती.

त्यामुळे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या निधीतून निधी मंजूर करून आणला. त्यामुळे आप की जय परिवाराकडून आभार व्यक्त करण्यात आले. १९३७ पासून आमचे पूर्वज ब्रिटिशांच्या काळापासून शासनाकडे रंजनपूरच्या विकासासाठी प्रयत्नशील होते, आता आम्हीही त्यादृष्टीने सतत प्रयत्न करत आहोत.

मंत्री, आमदार, खासदार, पालकमंत्री रंजनपूरला आले. मात्र विकासाकडे कोणीही लक्ष दिले नाही. वेळ निभावून गेले व आमचा वापर राजकारणासाठी केला.

परंतु आमदार राजेश पाडवी यांनी त्यांची दखल घेऊन आदिवासींच्या कल्याणासाठी सुविधा दिली, असे मत गुलाम बाबा यांच्या वंशजांनी व्यक्त केले.

MLA Rajesh Padvi and followers present at the Bhoomi Puja of various development works.
Nashik Traffic News : ‘वाहतूक सुरक्षा सप्ताहा’ची उदासीनता; ना प्रबोधन, ना जनजागृती

या वेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या पार्वतीबाई पाडवी, उपसभापती विजयसिंह राणा, शानूबाई पाडवी, भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी, विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, निवडणूकप्रमुख कैलास चौधरी, भरत पवार, अनिल पवार.

दरबारसिंग वसावे, प्रवीण वळवी, बांधकाम विभागाचे अधिकारी नितीन वसावे, स्वीकृत नगरसेवक जितेंद्र माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश वळवी, माजी सभापती आकाश वळवी, गौरव वाणी, श्याम राजपूत, डॉ. पुंडलिक राजपूत.

पोलिसपाटील भरत पाटील, प्रवीणसिंह राजपूत, हेमलाल मगरे, बळिराम पाडवी, सरपंच रवींद्र भिलाव, तळवे सरपंच मोग्या भिल उपस्थित होते. कापुरे यांनी सूत्रसंचालन केले. जितेंद्र पाडवी यांनी आभार मानले.

MLA Rajesh Padvi and followers present at the Bhoomi Puja of various development works.
National Youth Festival: राष्ट्रीय युवा महोत्सवावर महाराष्ट्राची मोहोर; क्रीडामंत्र्यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com