Ranjana-Bhanasi
Ranjana-Bhanasi 
उत्तर महाराष्ट्र

शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर भाजप बॅकफुटवर

सकाळवृत्तसेवा

नाशिक - विल्होळी येथील जलशुद्धीकरण केंद्राला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा पहिला प्रस्ताव सादर झाला. 

सभागृहनेते दिनकर पाटील यांनी घुसखोरी करत सादर केलेल्या प्रस्तावानुसार माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संतापलेल्या शिवसेनेने महासभा चालू न देण्याचे जाहीर करत आक्रमक भूमिका घेतली होती. त्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भाजप बॅकफुटवर आला असून, ठाकरे की वाजपेयी याचा निर्णय नामकरण समिती घेणार आहे, असे महापौर रंजना भानसी यांनी जाहीर केले. 

मुकणे धरणातून थेट पाइपलाइनद्वारे नाशिक शहरात पाणी आणले जाणार आहे. त्यासाठी विल्होळी येथे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले आहे. मुकणे धरणातील पाण्याचा थेंबही अद्याप केंद्रात पोचला नसताना जलशुद्धीकरण केंद्राला कोणाचे नाव द्यायचे यावरून वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेचे सुदाम डेमसे यांनी नोव्हेंबरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सादर केला. पण सभागृहनेते दिनकर पाटील यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा दिलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला. नियमानुसार ज्याचा पहिला प्रस्ताव येतो, तो मान्य करावा लागतो. शिवाय महापालिकेने नावे देण्यासाठी नामकरण समिती गठित केली आहे. वाजपेयी यांचे नाव देताना श्री. पाटील यांचा पहिला प्रस्ताव आल्याचा दावा सत्ताधारी भाजपकडून करण्यात आला होता. पण शिवसेनेने प्रस्तावाच्या घुसखोरीची चिरफाड करताना महासभा चालू न देण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्‍वभूमीवर वाद नको म्हणून नमते घेत नामकरण समितीतर्फे नावाचा निर्णय होणार असल्याचे स्पष्ट केले.

नामकरणाबाबत भाजप व शिवसेनेत कुठलाही वाद नाही. बाळासाहेब ठाकरे व अटलबिहारी वाजपेयी दोन्ही नेते महान असून, त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल.
- रंजना भानसी, महापौर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT