Shailesh-Bondarde
Shailesh-Bondarde 
उत्तर महाराष्ट्र

कर्करुग्णांना ‘गोखले’च्या मित्रांचा आधार

प्रशांत कोतकर

नाशिक - अवघा चार वर्षांचा मुलगा... रक्ताचा कर्करोग, उपचारासाठी पैसे नसल्याने माता-पित्याने देवाला सोडण्याची व्यक्त केलेली इच्छा... ऐकल्यानंतर मेडिकल ऑकोंलॉजिस्ट डॉ. शैलेश बोंदर्डे यांनी मोबदला न घेता उपचार करण्याचा निर्णय घेतला. उपचारासाठी मदत करणाऱ्या आठ मित्रांचा ताफा आता तीन हजारांवर पोचला आहे. हे सर्व जण गोखले एज्युकेशन सोसायटी संचालित एचएएलच्या स्कूलचे माजी विद्यार्थी आहेत.

डॉ. शैलेश बोंदर्डे त्यांच्या रुग्णालयात २०१० मध्ये ग्रामीण भागातील चार वर्षांचा मुलगा उपचारासाठी आला होता. तपासणीअंती त्याला रक्ताचा कर्करोग असल्याचे दिसून आले. ‘उपचारासाठीचा मोठा खर्च पेलवणार नाही. मुलाला देवाला सोडण्याचा निर्णय घेतला असून, दुसरा मुलगा जन्माला घालू,’ असे सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी मित्रांना ही बाब त्यांनी सांगितले. मित्रांनी ‘तू उपचार कर, आम्ही पैसे देतो,’ असे सांगून धीर दिला अन त्यातून निर्माण झाले ते ‘नाशिक कॅन्सर फाउंडेशन.’

आठ वर्षांत ७३ रुग्णांना दिलासा
या फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ. बोंदर्डे यांनी जनजागृती करण्यास प्रारंभ केला. सुरवातीला आठ मित्र आले. त्यानंतर हळूहळू हा परिवार वाढत गेला.‘एचएएल’चे माजी विद्यार्थी एकत्र येऊ लागले. २०११ पासून या मित्रांनी नाशिकसह नगर जिल्ह्यातील  ७३ कर्करोगाच्या रुग्णांना लाखोंची आर्थिक मदत केली आहे. डॉ. बोंदर्डे हे उपचाराचा खर्च घेत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : अमेठीतून राहुल गांधी उद्या भरणार अर्ज? सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT