Capture in a leopard cage at Pimpalwad Mhalsa
Capture in a leopard cage at Pimpalwad Mhalsa 
उत्तर महाराष्ट्र

पिंपळवाड म्हाळसा येथे बिबट्या पिंजर्‍यात कैद

दीपक कच्छवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : गेल्या अनेक दिवसांपासून वनविभागाच्या हातावर तुरी देणार्‍या बिबट्याला अखेर रविवारच्या मध्यरात्री पिंपळवाड म्हाळसा (ता.चाळीसगाव) येथील गोटु देशमुख यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात कैद करण्यात आले आहे. घटनास्थळी वनविभागाचे पथकही दाखल झाले आहे.

वरखेडे परिसरात मागील वर्षी याच भागात बिबट्याने हैदोस घातला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या परिसरात बिबट्या  अनेकांच्या नजरेस पडला होता. या परिसरात बिबट्याने अनेक पशुधनाचा फडशा पाडला होता. त्यामुळे वनविभाग देखील बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते.


आज पिंपळवाड म्हाळसा येथील गोटु देशमुख यांच्या शेतात पिंजऱ्यात कैद झाला. येथे बिबट्याला पाहण्यासाठी आजुबाजुच्या नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या ठिकाणी बिबट्याला घेवुन जाण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी आले असुन हा बिबटय़ा साधारण दोन वर्षे वयाचा असल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT