janta kerfew
janta kerfew 
उत्तर महाराष्ट्र

धुळे जिल्ह्यात ६० तासांचा ‘जनता कर्फ्यू‘; रविवारपासून अंमलबजावणी 

रमाकांत घोडराज

धुळे ः शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने लोकप्रतिनिधी, समाजसेवी संघटना, व्यापारी संघटना आदींच्या प्रतिनिधींशी चर्चा करून अखेर १४ मार्चच्या सायंकाळी सहापासून ते १७ मार्चच्या सकाळी सहापर्यंत धुळे महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भागात ‘जनता कर्फ्यू’ घोषित करण्यात आला आहे. जिल्हावासीयांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूदरम्यान बंद पाळावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दिलीप जगदाळे यांनी केले आहे. 

जिल्ह्यात बुधवारी (ता. १०) तब्बल ३९८, तर गुरुवारी (ता. ११) ३१० असे दोन दिवसांत तब्बल ७०८ कोरोनाबाधित आढळून आल्याने संसर्गाचा धोका अधिक बनला आहे. यावर नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आवश्‍यक असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडकडीत लॉकडाउन करून निर्बंध लागू न करता लोकप्रतिनिधी, समाजसेवी संघटना, व्यापारी संघटना आदींच्या प्रतिनिधींशी चर्चा करून ‘जनता कर्फ्यू’चा पर्याय समोर आला. त्यानुसार प्रभारी जिल्हाधिकारी जगदाळे यांनी सायंकाळी ‘जनता कर्फ्यू’बाबत आदेश काढला. 

१४ ते १७ दरम्यान जनता कर्फ्यू 
जिल्हाधिकारी जगदाळे यांनी काढलेल्या जनता कर्फ्यूच्या आदेशात जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रासह पूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागात १४ मार्चच्या सायंकाळी सहा ते १७ मार्चच्या सकाळी सहापर्यंत जनता कर्फ्यू असेल. जनता कर्फ्यूचे तंतोतंत पालन होत आहे अथवा नाही याची जबाबदारी पोलिस, महापालिका व नगरपरिषद/नगरपंचायत व त्या- त्या स्थानिक स्वराज्य संस्थांची राहील. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित शिक्षेस पात्र राहील, यासाठी संबंधित स्थानिक प्रशासन जबाबदारी निश्‍चित करेल, असे आदेशात नमूद केले आहे. 

काय सुरू राहील 
रेल्वे, बस, विमानसेवा, जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक, टॅक्सी, रिक्षा (अत्यावश्‍यक व परीक्षेसाठी), चारचाकी व दुचाकी वाहने (अत्यावश्‍यक वैद्यकीय सेवा, शासकीय वैद्यकीय आस्थापना कर्मचारी व परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी), मेडिकल स्टोअर्स, हॉस्पिटल्स व ॲम्बुलन्स सेवा, दूध खरेदी-विक्री केंद्र, कृषी संबंधित कामे, औद्योगिक आस्थापना, कृषी सेवा केंद्र, पशुखाद्य केंद्र, पशुवैद्यकीय सेवा, शासकीय कार्यालये, बँका, वित्तीय सेवा व पोस्टल सेवा, पेट्रोलपंप (अत्यावश्‍यक सेवांसाठी), कुरिअर, सर्व प्रकारची मालवाहतूक, वृत्तपत्र मिडिया सेवा, पूर्वनियोजित परीक्षांना बंदमधून सूट. 

काय बंद राहील 
शैक्षणिक संस्था, शाळा- महाविद्यालये, हॉटेल- रेस्टॉरंट (होम डिलीव्हरी, पार्सल वगळता), किरकोळ भाजीपाला खरेदी विक्री केंद्र, धार्मिक स्थळे, सभा, मेळावे, बैठका, शासकीय- खासगी बांधकामे (मान्सूनपूर्व कामे वगळून), शॉपिंग मॉल्स, मार्केट, किराणा दुकाने, अनावश्‍यक इतर सर्व दुकाने, लिकर शॉप, बार्बर शॉप, स्पा, सलून, खासगी कार्यालये, गार्डन- पार्क- बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, प्रेक्षकगृहे, क्रीडा स्पर्धा, पानटपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे, प्रदर्शने, संमेलने, मेळावे, सांस्कृतिक- धार्मिक व तत्सम कार्यक्रम. 

परीक्षेसाठी सूट 
जनता कर्फ्यूदरम्यान सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी असणारा अधिकारी, कर्मचारी वर्ग व परीक्षार्थ्यांना निर्बंधातून सूट राहील. मात्र, संबंधितांनी त्यांचे ओळखपत्र व परीक्षेचे प्रवेशपत्र सोबत बाळगणे अनिवार्य आहे.  

 
संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: उत्तराखंडच्या जंगलातील आगीच्या घटनांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

SCROLL FOR NEXT