Child Marriage News
Child Marriage News esakal
उत्तर महाराष्ट्र

Child Marriage News : बालविवाह घडवून आणणारा पोलिस पाटील अखेर निलंबित; जिल्हा प्रशासनाची कठोर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : सांजोरी (ता. धुळे) येथे कायद्याच्या विरोधात जात बालविवाहास प्रोत्साहन दिल्याबद्दल जिल्हा प्रशासनाने पोलिस पाटलास कायद्याचा बडगा दाखवीत निलंबित केले आहे.

जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या सूचनेनुसार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंध कायद्याची आणि १०९८ चाईल्ड हेल्पलाईनबाबत व्यापक जनजागृती सुरु आहे. (Causing child marriage Police Patil suspended Sanjori Dhule district administration strict action Dhule News)

त्यामुळे अनेक गावातील ग्रामस्थ तक्रारीसाठी पुढे येत असल्याने जिल्ह्यात बालविवाह थांबविण्याचे प्रमाण वाढले आहे.

परंतु, सांजोरी येथे २२ मे २०२३ ला बालविवाह होत असल्याची तक्रार चाईल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ वर प्राप्त झाली. त्यानुसार पोलिस यंत्रणा, चाईल्ड लाईन, जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे प्रतिनिधी, स्थानिक यंत्रणा घटनास्थळी पोहोचली.

या प्रकरणाची माहिती सनदी अधिकारी सत्यम गांधी, धुळे गटविकास अधिकाऱ्यांना प्राप्त होताच त्यांनी पाठपुरावा सुरू केला. सांजोरी येथील पोलिस पाटील निंबा सुरेशसिंग पवार याने त्याचा मुलगा विजय निंबा पवार (वय २४) याचा विवाह पुरमेपाडा (ता. धुळे) येथील १६ वर्षीय बालिकेशी २२ मेस नियोजित केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

घटनास्थळी कागदपत्रांची पडताळणी केली असता मुलगी अल्पवयीन असल्याची खात्री झाली. नंतर संबंधित कुटुंबाला तसेच बालविवाह घडत असताना उपस्थित घटक बॅण्डवादक, डीजेचालक, भटजी, आचारी, फोटोग्राफर आदींना पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

सर्वांची सत्यम गांधी यांनी चौकशी करीत पुढील कारवाईचा पोलिस यंत्रणेला आदेश दिला. त्याचबरोबर निंबा पवार हे सांजोरीचे पोलिस पाटील असल्याने ग्राम बाल संरक्षण समितीचे पदसिद्ध सदस्य आहेत.

याअनुषंगाने निंबा पवार याची पोलिस पाटील व ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य म्हणून बालविवाहास प्रतिबंध करणे तसेच त्यांचे कार्यक्षेत्रात जनजागृती करणे, अशी कायदेशीर जबाबदारी होती.

तरीही त्याने त्याच्या मुलाचा विवाह १६ वर्षीय बालिकेशी लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिस पाटलाने बालविवाह प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार सत्यम गांधी, गटविकास अधिकाऱ्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. त्यांनी पोलिस पाटील निंबा सुरसिंग पवार यास कर्तव्यात कसूर केल्याने निलंबित केले.

बंधने आणि तरतूदी

विवाहासाठी वधूचे वय १८ व वराचे वय २१ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. सांजोरी येथील घटनेत बालविवाह कायद्यानुसार गुन्हा घडला असून पोलिस पाटलाने बालविवाह प्रतिबंध अधिनियमातील कलम ९, १० व ११ चे उल्लंघन केले आहे.

त्यामुळे पोलिस पाटलावर निलंबनाची कारवाई झाली आहे. बालविवाह होऊ नये याबाबत खबरदारी घेणे, आपापल्या गावात जनजागृती करणे ही जबाबदारी ज्या स्थानिक घटकांवर आहे, त्या घटकांकडून कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कायद्याचा धाक सामान्यांना कसा बसेल? यादृष्टीने सांजोरी येथील कारवाई मार्गदर्शक ठरेल, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतीश चव्हाण यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

SCROLL FOR NEXT